Allu Arjun AA22xA6 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun: अ‍ॅटलीच्या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक लीक? फोटो व्हायरल

AA22xA6 Movie: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'AA22xA6' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये दीपिका पदुकोण देखील आहे. आता चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Allu Arjun: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची सर्वांनाच उत्सुकता असते. 'पुष्पा २' च्या जबरदस्त यशानंतर, हा अभिनेता आता त्याच्या नवीन प्रोजेक्ट 'AA22xA6' वर काम करत आहे. हा चित्रपट बॉलिवूडला १००० कोटींचा चित्रपट देणारे अ‍ॅटली दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. दरम्यान, सेटवरील अल्लू अर्जुनचा एक फोटो व्हायरल झाला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

लीक झालेल्या फोटोमध्ये त्याचा लूक कसा आहे?

सोशल मीडियावर लीक झालेल्या फोटोमध्ये अल्लू अर्जुन वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. तो काळ्या ट्रॅकसूटमध्ये आणि केसांचा पोनी टेल बांधलेला दिसत आहे. तो अॅक्शन सीन शूट करत असल्याचे दिसते. हा फोटो 'AA22xA6' च्या सेटवरील आहे की इतरत्र हे निश्चित झालेले नसले तरी, चाहते हा लूक पाहून खूप उत्सुक आहेत.

अल्लू अर्जुन दुहेरी भूमिकेत दिसणार का?

AA22xA6 हा अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली यांचा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अल्लू अर्जुन एक नाही तर दोन भूमिका साकारणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे आणि म्हणूनच चाहते त्याबद्दल अधिक उत्सुक आहेत.

दीपिका पदुकोण दिसणार

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण AA22xA6 मध्ये अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी, चित्रपट निर्मात्यांनी दीपिकाचे स्वागत करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. अहवालानुसार दीपिका चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना मिळतात ₹३०००; अटी काय? वाचा सविस्तर

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

SCROLL FOR NEXT