Rashmika-Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rashmika-Allu Arjun: पुष्पा अन् श्रीवल्लीचा स्वॅगच भारी! 'अंगारो सा' गाण्यावर थिरकले; पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, पाहा VIDEO

Rashmika Mandanna - Allu Arjun Dance Video : पुष्पा अन् श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांनी चाहत्यांसाठी 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

'पुष्पा 2' (Pushpa 2) हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे मोठ्या संख्येने प्री-बुकिंग देखील झाले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीची भूमिका तर अल्लू अर्जुनने पुष्पाची भूमिका साकारली आहे. सध्या रश्मिका आणि अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर रश्मिका आणि अल्लू अर्जुनचा प्रमोशन दरम्यानच्या डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुष्पा आणि श्रीवल्ली 'अंगारों' या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. हा डान्स त्यांनी मुंबईत आयोजित केलेल्या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये केला आहे. त्यांच्या या डान्सने चाहत्यांची मने जिंकली. त्यांनी 'अंगारों' या गाण्याची सिग्नेचर स्टेप करून चाहत्यांना वेड लावले.

'पुष्पा द राईज' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. 'पुष्पा द राईज' 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावायला येणार आहे.

'पुष्पा 2'च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी रश्मिका मंदानाने खूप खास लूक केला होता. तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले. रश्मिकाने काळ्या रंगाची खूपच स्टायलिश साडी नेसली होती. ती या साडीत खूपच सुंदर दिसत होती. मोकळे केसांनी तिचा लूक अजून खुलून आला होता. 'पुष्पा 2' हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार? PM मोदी आणि CM फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT