Dhurandhar 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: अल्लू अर्जुन ते अनन्या पांडे; चाहत्यांसह आता सेलिब्रिटींमध्येही 'धुरंधर 2'ची क्रेझ

Dhurandhar 2: ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. बॉलिवूड कलाकारांना या चित्रपटाने भूरळ घातली आहे.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2: धुरंधर या चित्रपटाचा पुढील भाग धुरंधर द रिव्हेंज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच, चाहते या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुक होते. या चित्रपटाने एडव्हांस बुकिंगचे  (advance bookings) अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहिला असून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटाबद्दल कलाकार काय म्हणाले, ते आपण जाणून घेऊया.

अल्लू अर्जुन

दक्षिण भारतीय स्टार अल्लू अर्जुनने चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, यामध्ये त्याने चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. त्याने चित्रपटातील संपूर्ण कलाकार आर.माधवन, रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

राम गोपाल वर्मा

दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेही धुरंधर 2 बद्दलचे आपले मत 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर मांडले. या चित्रपटासाठी रात्री उशिरा केलेल्या एका ट्विटमध्ये त्याने लिहिले, "ज्या ज्या लोकांनी आज हा चित्रपट पाहिला, त्या सर्वांनी मला सांगितले की त्यांना धुरंधर केवळ आवडला नाही तो आजपर्यंतचा सर्वात उत्तम चित्रपट वाटला.

अनन्या पांडे

अभिनेत्री अनन्या पांडेनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजद्वारे रणवीर सिंगचे कौतुक केले. चित्रपटाची प्रशंसा करताना, तिने आपल्या पोस्टमध्ये "Beast" (जबरदस्त) असे कॅप्शन दिले.

कार्तिक आर्यन

अभिनेता कार्तिक आर्यननेही आपल्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाबद्दल प्रशंसा केली. त्याने या चित्रपटाचे वर्णन उत्कृष्ट (top-notch) असे केले आणि एक भव्य सिनेमॅटिक अनुभव दिल्याबद्दल आदित्य धरचे कौतुक केले. त्याने रणवीर सिंगचीही प्रशंसा केली.

प्रीती झिंटा

प्रीती झिंटाही हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती; त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाचे कौतुक केले. आपल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले: "जर सूड घ्यायचाच असेल, तर तो धुरंधर सारखाच असावा अन्यथा, त्या फंदात पडूच नका."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT