Pushpa2  googel
मनोरंजन बातम्या

Pushpa2: 'पुष्पाराज' आला गोत्यात; चित्रपट स्क्रिनिंगच्या वेळी महिलेचा मृत्यू, अल्लू अर्जुनविरुद्धात गुन्हा दाखल

Actor Allu Arjun: महिलेच्या मृत्यू प्रकरणात अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर चित्रपटगृहाविरुद्धात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे, पुष्पा फेम अभिनेत्याच्या विरुद्धात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेच्या मृत्यू प्रकरणात सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकेच नाही तर हैदराबाद येथील एका चित्रपटगृहाविरुद्धातही गुन्हा दाखल झालाय.

काय आहे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबरच्या दिवशी हैदराबादमधील संध्या या चित्रपटगृहात पुष्पा -2 या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगच्या वेळी चाहत्यांना सरप्राईज भेट देण्यासाठी अल्लू अर्जुन न सांगता संध्या चित्रपटगृहात आला होता. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली. या गर्दी चेंगराचेंगरी झाली असून यात एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनला आरोपी ठरवण्यात आले आहे.

तसेच अभिनेता अल्लू अर्जुन आणि संध्या चित्रपटगृहाच्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या चेंगराचेंगरीच्या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, शिवाय एक ९ वर्षाचा मुलगा बेशुद्ध झाला होता अशी माहिती मिळालीय.

चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू

अल्लू अर्जुन आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यात अनेकजण जखमी झाले. दिलसुखनगर येथे राहणाऱ्या रेवती ( वय 39) या पती आणि श्री तेज (7) आणि सान्विका (7) या दोन मुलांसह संध्या थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या.

अल्लू तिथे येताच अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुलगा दबल्या गेले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला आणि मुलाला विद्यानगर येथील दुर्गा भाई देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे रेवती यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मुलाला बेगमपेठेतील KIMS रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शोच्या वेळेवर नाराजी

या संपूर्ण प्रकरणाबाबत अल्लू अर्जुनशी माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर अल्लू अर्जुन म्हणाला, तो त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो, असं म्हणत अभिनेत्याने आपली बाजू मांडली. काही लोक चित्रपटाच्या शोच्या वेळेवर आक्षेप घेत आहेत. हैदराबादच्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2'चे शो पहाटे 3 वाजता निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या कन्नड फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनने बेंगळुरू जिल्हा आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

चित्रपटगृहात 'पुष्पा 2'चे शो पहाटे 3 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय चित्रपटाच्या तिकीट दराबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. चित्रपटाच्या तिकिटाचे दर 500, 1000 आणि 1500 रुपये आहेत. या किमतीही कायद्याच्या विरोधात असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांवर आवश्यक ती कारवाई व्हायला हवी,अशी मागणी काही लोकांनी पत्राद्वारे केलीय.

दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपटाच्या मिडनाइट शोचा चाहत्यांनी आनंद लुटला.चाहते चित्रपटगृहांच्या आतील चित्रपटाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल करताहेत. अल्लूने साडी नेसून जबरदस्त डान्स केलाय. समीक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिलाय. अल्लूचा हा चित्रपट बंपर कमाई करेल असा विश्वास चाहत्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

SCROLL FOR NEXT