Maherchi Saadi Sequel  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alka Kubal: ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’, तीन दशकानंतर ‘माहेरची साडी’चा सिक्वेल येणार?

तीन दशकानंतर ‘माहेरची साडी’चा सिक्वेल येणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे. मुख्य भूमिकेत असणाऱ्या अलका कुबल यांनी चित्रपटाच्या सिक्वेल बद्दल सांगितले.

Chetan Bodke

Alka Kubal Maherchi Saadi 2 Film: मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. ९०च्या दशकात गाजलेल्या आणि अजरामर चित्रपटांमध्ये अलका कुबल यांचा ‘माहेरची साडी’ हा चित्रपट फारच गाजला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल आज ३० वर्ष उलटले असले तरी प्रेक्षकांच्या ओठांवर या चित्रपटाचं नाव आहे.

तीन दशकानंतर ‘माहेरची साडी’चा सिक्वेल येणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे. मुख्य भूमिकेत असणाऱ्या अलका कुबल यांनी चित्रपटाच्या सिक्वेल बद्दल सांगितले.

या चित्रपटाबद्दल आजही प्रेक्षकांच्या सोशिक सून, खाष्ट सासू, लेकीवर नाराज असणारे वडील आणि वडिलांप्रमाणे जीव लावणारा भाऊ या भूमिका मनात घर करुन निर्माण करुन आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार असल्याने त्यांनी हा चित्रपट चांगलाच गाजवला.

आजही या चित्रपटातील सर्वच कलाकारांना ‘माहेरची साडी’ चित्रपटातील भूमिकेमुळे ओळखले जातात. एकंदरितच या चित्रपटाचा महाराष्ट्रात एक मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान अलीकडेच ‘झी चित्र गौरव २०२३’ या सोहळ्यात अभिनेत्री अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना'माहेरची साडी'च्या दुसऱ्या भागाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अंकिता वालावकरने अलका कुबल यांना काही प्रश्न विचारले. ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ या टॅगलाइन अंतर्गत यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडत आहे.

अंकिताने अलका यांना पुरस्कार सोहळ्यात प्रश्न विचारला, “ ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचा सिक्वल अर्थात दुसरा भाग येणार असून त्यात अलका कुबल सुनेचा छळ करताना दिसणार असल्याची माहिती आम्हाला समजली आहे.

तर याबद्दल तुमचे काय मत आहे?” अंकिताने हा प्रश्न मराठीत विचारला नसून मालवणी भाषेत प्रश्न विचारला होता. यावर अलका कुबल यांनी हे उत्तर मालवणीतच दिले.

यावर अलका कुबल म्हणतात, “ ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचा सिक्वल अर्थात दुसरा भाग येणार असल्याचं माहिती नाही. खरं तर ही बातमी मी काल वाचली पण, अद्याप याची खरंच माहिती नाही.”

पुढे अंकिता अलका यांना प्रश्न विचारते, ‘जर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली तर, मला तुम्ही माहेरची साडी देणार का?’ तर अलका कुबल तिला ‘हो’ असं म्हणाल्या आहेत.

अलका कुबल, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, विक्रम गोखले इ. तगड्या कलाकारांची स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली. विजय कोंडके दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT