Alia Bhatt rehearses Bengali Language Instagram
मनोरंजन बातम्या

Ranveer-Alia's Film Promotion in Kolkata: अरेव्वा! आलिया भट्ट इथंही आघाडीवर, इंग्लिश, हिंदीच नाही, तर आणखी एक भाषा बोलते, तेही न अडखळता!

Chetan Bodke

Alia Bhatt rehearses Bengali Language: आलिया- रणवीर मुख्य भूमिकेत असलेले ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपट येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. आलिया- रणवीरसह चित्रपटाची टीम सध्या देशात चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच आलियाचा सध्या एक सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ती अस्खलित बंगाली भाषा बोलताना दिसत आहे. नुकतंच आलियाने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आलिया- रणवीरचा हा एकत्र दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी ते ‘गली बॉय’मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. सध्या आलिया- रणवीर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून सध्या ते भारत दौरा करत आहे.

नुकतंच त्यांनी प्रमोशन दरम्यान कोलकात्यात हजेरी लावली होती. यावेळी प्रमोशनमध्ये असताना, आलियाने कोलकात्यात जाऊन अस्खलित बंगाली भाषा बोलली आहे. यावेळी तिच्यासोबत रणवीर सिंगने देखील बंगाली भाषा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आलियाने या चित्रपटात बंगाली मुलीचे पात्र साकारले आहे. आलियाने ट्रेलरमध्ये देखील काही दृश्यांमध्ये बंगाली भाषा बोलली आहे. आलिया सध्या या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे. आलियाने हा प्रमोशन दरम्यानचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “‘रॉकी और राणी की कोलकाता की कहाणी’ फक्त ३ दिवस बाकी, #RockyAurRaniKiPremKahaani येत्या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.”

अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सने कौतुक केले आहे. सोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील तिचे कौतुक केले आहे. तर अनेक चाहत्यांनी ‘तू खूप सुंदर बंगाली भाषा बोलते’ अशी ही प्रतिक्रिया दिली. तर काहींनी तिच्या लूकचे कौतुक केले.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपट येत्या २८ जुलै २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्य भूमिकेत रणवीर सिंग, आलिया भट्ट सोबत शबाना आझमी, धर्मेंद्र,जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील या चित्रपटात दिसणार आहे. करण जोहरला फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करून या चित्रपटानिमित्त २५ वर्ष पूर्ण झाले आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहर तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ए दिल है मुश्कील’ हा चित्रपट करणचा अखेरचा दिग्दर्शित केलेला चित्रपट ठरला. इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT