Alia Bhatt at the National Film Award Ceremony Saam TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Saree: लग्नानंतर आणखी एका खास क्षणांसाठी आलियाने केलं OUTFIT रिपीट, नॅशनल अ‍ॅवॉर्डदरम्यान अभिनेत्रींच्या साडीची चर्चा

Alia Bhatt At National Award Ceremony: आलिया भटला तिच्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' राष्ट्रीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आला आहे.

Pooja Dange

Alia Bhatt In Her Wedding Saree:

आलिया भटला तिच्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा राष्ट्रीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आला आहे. आलिया भट पती रणबीर कापूरसह दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होती.

आलिया भटने या पुरस्कार सोहळ्यासाठी खूप सुंदर लूक केला आहे. सध्या सोशल मीडियावर आलिया भटच्या या लूकची चर्चा आहे. दरम्यान आलिया भटने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी तिच्या लग्नातील साडी नेसली असल्याची चर्चा सुरू आहे.

आलिया भटने ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी सफेद आणि सोनेरी रंगाच्या साडीची निवड केली होती. आलियाने गळ्यात चोकर घातला होता. तसेच त्याला मॅचिंग कानातले घातले होते. आलियाने केसांचा बन बांधला होता आणि केसात फुले माळली आहेत. आलिया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आलिया सोबत या सोहळ्याला हजर असलेल्या रणबीर कपूरने ब्लॅक इंडो-वेस्टर्न आऊटफिट घातले आहे.

आलिया भटचा या पुरस्कार सोहळच्या आधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आलियासोबत या सोहळ्याला आला. पण तो आलियाच्या मागेच होता. आलिया फॅनसोबत फोटो घेत असताना तो दूर उभा होता. आलिया मुलखात देत असताना देखील तो मधे नाही. पण पत्नीचे कौतुक करायला आणि पाहायला तो तिच्यासोबत उपस्थित होता. रणबीर कपूरच्या या गेस्चरचे नेटकरी कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये आलियाचा संपुर्ण लूक तुम्ही पाहू शकता. आलियाच्या फॅन्सना तिची ही साडी लगेच लक्षात येईल. आलियाने तिच्या लग्नात नेसलेली साडी पुन्हा नेसली आहे. फार क्वचितच सेलिब्रिटी असे करताना दिसतात. त्यामुळे आलियाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. नेटकरी आलियाने तिच्या लग्नातील साडी नसली असल्याचे म्हणत कमेंट केल्या आहेत. तसेच आलियाने साडी रिपीट करून गोष्टी नॉर्मलईज केल्या आहेत, असे नेटकऱ्यांचे मत आहे. तिच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

आलिया भट मुलगी राहा जन्म दिल्यानंतर देखील चित्रपटांमध्ये खूप सक्रिय आहे. आलियाने हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. आलिया संजय लीला भंसाली यांच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. आलियाच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'रॉकी ओर रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट खूप गाजला. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT