Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review Instagram
मनोरंजन बातम्या

Rocky Aur Rani Kii Prem Kahani Review : आलिया-रणवीरच्या प्रेमकथेतून समाजातील गंभीर परिस्थितीवर भाष्य ; रॉकी ओर रानी की प्रेम कहानी रिव्ह्यू

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : आलिया भट आणि रणवीर सिंग अभिनित आणि कारण जोहर दिग्दर्शित रॉकी ओर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.

Pooja Dange

Alia Bhatt - Ranveer Singh Movie Review : आलिया भट आणि रणवीर सिंग अभिनित आणि कारण जोहर दिग्दर्शित रॉकी ओर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट आज म्हणजे २८ जुलैला प्रदर्शित झाला आहे.

हौशी पंजाबी मुलगा, रॉकी आणि एक सुशिक्षित बंगाली टीव्ही न्यूज अँकर, राणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध असल्याने दोघे एक प्लॅन करतात. नात्याला यशस्वी करण्यासाठी तीन महिने दोघे एकमेकांच्या घरी राहायचं ठरवतात.

रणवीर सिंगसोबत बॉलिवूड स्टार्स वरूण धवन, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांचा डान्स आहे. हा चित्रपट मनोरंजक, जास्त विचार कार्याला न लावणारी आणि ग्लॅम असलेली आहे. करण जोहरच्या चित्रपटाचे सर्व प्रकार या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहेत, असे असले तरी चित्रपटातूनन एक अर्थपूर्ण मेसेज देखील देण्यात आला आहे.

पितृसत्ता समाज, स्त्री पुरुष असमानता, बॉडी शेमिंग, शरीराची लाज आणि आपल्या भारतीय समाजातील खोलवर रुजलेल्या अनुषं रूढी आणि परंपरा यावर चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. या सर्व गोष्टी जितक्या गंभीर आहेत तितक्याच विनोदी पद्धतीने त्या चित्रपटामध्ये मांडण्यात आल्या आहेत. (Latest Entertainment News)

रॉकी रंधावा (रणवीर सिंग) हा धनलक्ष्मी नावाच्या यशस्वी मिठाई व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलगा आहे. रॉकीला त्याचे स्मृतीभ्रंश झालेले आजोबा कंवल (धर्मेंद्र) यांच्या आठवणींना त्याच्या भूतकाळातील जामिनी चॅटर्जी (शबाना आझमी) , जी राणीची (आलिया भट्ट) ठकुमा (आजी) यांना एकत्र आणण्याची इच्छा आहे.

दरम्यान रॉकी बुद्धीमान आणि सुसंस्कृत राणीला भेटतो. या दोघांची व्यक्तिमत्त्वे भिन्न असूनही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. हा चित्रपट संस्कृती आणि व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षावर देखील भाष्य करतो.

लोक त्यांच्या जोडीदाराविषयी कसे निर्णय घेतात आणि कसे एकमेकांना गृहीत धर्ततात हे या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. परंतु अत्यंत हुशारीने चित्रपटामध्ये कॉमेडीचा वापर केला आहे. चित्रपटामध्ये तुम्हाला कारण जोहरची शैली दिसून येईल.

रॉकी-राणीचे आजच्या कलालतिल प्रेम सुंदरपणे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटातील संवाद विशेष आहेत. करण जोहरच्या जुन्या चित्रपटातील अनेक संवाद तुम्हाला या चित्रपटामध्ये दिसतील आणि तुम्हाला प्रेमात पडतील.

कौटुंबिक आणि सामाजिक कंडिशनिंगमुळे स्त्री - पुरुष समानतेबद्दल मायोपिक असलेला एक खूप प्रेमळ आणि संवेदनशील पंजाबी माणूस म्हणून रणवीर सिंग उत्तम प्रकारे या भुमिकेत फिट झाला आहे. रणवीरकडे चित्रपटातील सर्वात गंमतीशीर वन-लाइनर आहेत, जे तो मोठ्या सहजतेने बोलताना आपल्याला दिसतो आणि प्रेक्षकांना प्रभावित करते.

आलिया भट एक तडफदार आणि आत्मविश्वासी मुलगी दिसत आहे. ती तुम्हाला इमोशनल सीन दरम्यान इंप्रेस करते. पण बंगाली भाषेबर पकड असती तर अजून मजा आली असती.

राणीचे वडील चंदन (तोटा रॉय चौधरी) यांचा जाहीरपणे अपमान करणे असो किंवा जैमिनीबद्दल असुरक्षित असणे असो, जया बच्चन एक बहुआयामी व्यक्तिरेखा सुंदर वाढवलीआहे.

शबाना आझमीने अभिनय उत्तम केला आहे आणि बंगाली आणि हिंदीमध्ये स्विच करताना त्यांचा कोणताही गोंधळ होत नाही. धर्मेंद्र यांची छोटी पण प्रभावी भूमिका आहे. आमिर बशीर, तिजोरीच्या भूमिकेत, रॉकीचा दुराचार करणारा बाप साकारत आहे. राणीची सहकारी सौमेनच्या भूमिकेत नमित दास आहे.

प्रीतमचे संगीत लक्षवेधक असताना, व्हॅट झुमका? आणि धिंडोरा बाजा रे, आणि रोमँटिक तुम क्या मिले, सर्व गाणी भव्य आणि सुंदर चित्रित केली आहेत. डोला रे डोला रेडक्स देखील लक्ष वेधून घेते.

कथेला सेट व्हायला थोडा वेळ लागतो आणि फर्स्ट हाल्फ थोडा संथ आहे, पण नंतर वेग घेते आणि सेकेंड हाल्फमध्ये खूप मनोरंजक बनते. रॉकीचे आई-वडील राणीचा लग्नासाठी हात मागतात तेव्हा मानसिकतेत झालेल्या बदलांचे सूक्ष्मपणे चित्रण करण्यात आले आहे. ते दोघे तेव्हा म्हणतात, त्यांच्या मुलाने राणीला त्यांची सून होण्यास सांगण्याऐवजी चटर्जींचा जावई व्हावे. रॉकी और रानी की प्रेम कहानी ही एक मनोरंजक आणि गोड प्रेमकथा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: २ महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीनिमित्त घरी आले; घरात आढळले शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह

Kitchen Safety Tips: किचनमध्ये गॅस सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गोकुळ दूधसंघाच्या प्रकरणात सतेज पाटील यांना न्यायालयाकडून न्यायची अपेक्षा

EPFO Update : मोठी बातमी! EPF खात्यातील चुकीचं नाव किंवा जन्मतारीख घरबसल्या बदला; फक्त ५ सोप्या स्टेप्स

Palak Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट पालक पनीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT