Love & War Saam Tv
मनोरंजन बातम्या

Love & War: आलिया भट्ट, रणबीर कपूरचा 'लव्ह अँड वॉर' चित्रपट नाही होणार प्रदर्शित? संजय लीला भन्साळींचा खुलासा

Love & War Movie: संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट लव्ह अँड वॉर बद्दल सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. काही अहवालांनुसार या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

Shruti Vilas Kadam

Love & War Movie: संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपटलव्ह अँड वॉर बद्दल सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. काही अहवालांनुसार या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगितले जात होते तर, काही ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, भन्साळींच्या टीमने या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगितले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, चित्रपट ठरवलेल्या तारखेला २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे आणि कोणतीही विलंब प्रक्रिया सुरू नाही.

या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, त्यामुळेच त्याच्याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, रणबीर आणि आलिया यांचा ब्राम्हस्त्र नंतर हा दुसरा चित्रपट आहे.तसेच या चित्रपटात विकी कौशलसारखा दमदार अभिनेता यात असल्यानं, हे त्रिकूट मोठ्या पडद्यावर धमाका करणार हे नक्की आहे. त्यामुळेच रिलीजबाबत कुठलीही अफवा पसरल्यास ती लगेच लक्ष वेधून घेते.

भन्साळी प्रॉडक्शनकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “Love & War बद्दल प्रसारित होत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या विलंबाच्या बातम्या चुकीच्या आहेत. चित्रपट निश्चित वेळेतच प्रदर्शित होणार आहे आणि संपूर्ण टीम शेड्यूलप्रमाणे काम करत आहे. कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.” हे निवेदन स्पष्ट करते की चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरळीत सुरू असून चाहत्यांनी चिंता करण्याची गरज नाही असे म्हटले आहे.

Love & War हा एक रोमँटिक-ड्रामा असून हा एक हिस्टोरिकल ड्रामा आहे. संजय लीला भन्साळी यांची खास शैली, भव्य सेट्स आणि क्लासिक संगीताची जोड असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक संस्मरणीय अनुभव ठरण्याची शक्यता आहे. रिलीजपर्यंत चाहत्यांनी संयम ठेवावा आणि अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असा संदेश प्रॉडक्शन हाऊसकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातले सर्वाच पहिले धान्य कोणते? जाणून घ्या रोचक माहिती

Lalbaug Visarjan 2025 : लालबाग राजाच्या विसर्जनाला विघ्न, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल

Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

SCROLL FOR NEXT