Alia Picked Up Paparazzi Shoes Saam TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Helps Paparazzi : आलियावर कौतुकाचा वर्षाव ; चक्क पापाराझींची चप्पल हातात घेतली अन्...

Alia Bhatt’s Sweet Gesture : आलियाने स्वतःच्या हाताने त्या फोटोग्राफरची चप्पल उचलून त्याला दिली.

Pooja Dange

Alia Bhatt Find Paparazzi Shoe : अभिनेत्री आलिया भट गुरुवारी तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भटसोबत दिल्लीतील एक इव्हेंट करून मुंबईत परतली आहे. एका हॉटेलबाहेर अनेक फोटोग्राफर त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी धावले.

दरम्यान त्यांच्यापैकी एकाची चप्पल हरवली. हे लक्षात आल्यानंतर, आलियाने त्या फोटोग्राफरला चप्पल शोधण्यास मदत केली. आलियाने स्वतःच्या हाताने त्या फोटोग्राफरची चप्पल उचलून त्याला दिली.

नुकत्याच घडलेल्या घटनेतील आलिया आणि तिच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्वेटशर्ट आणि ट्राउजरमध्ये असा कॅज्युअल लूक आलिया होती. पापाराझींनी फॅमिली फोटोसाठी मागणी केल्यामुळे आलिया, शाहीन आणि सोनी एकत्र आल्या आणि कॅमेऱ्यांसमोर पोझ दिली. (Latest Entertainment News)

फोटो काढून झाल्यानंतर त्या तिघी जेव्हा त्यांच्या गाडीकडे जात होत्या तेव्हा आलियाला हरवलेली चप्पल दिसली. त्याबद्दल चौकशी केली असता, अनेक पापाराझींनी तिला सांगितले की ते त्यांच्यापैकी कोणाचे तरी आहे. आलियाने ती चप्पल लगेच उचलली, तिला पापाराझी राहू द्या, असे सांगत होते. तरीही आलियाने ती चप्पल उचलली आणि कोणाची चप्पल आहे, हे पाहून ती चप्पल त्याला दिली.

त्या व्यक्तीने तिचे आभार मानले आणि ती कारमध्ये गेली आणि पापाराझींना बाय केला. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका इंस्टाग्राम युजरने पोस्टवर कमेंट करत लिहिले, "ती खूप गोड आहे." “तू खूप नम्र आहेस डिअर.'" निगेटिव्ह कमेंट देखील केल्या आहेत, एका युजरने म्हटले आहे "या महिन्यात तिचा चित्रपट प्रदर्शित होत नसता तर तिने असे केले नसते!"

आलिया भटची नवीन पोस्ट

आलियाने तिच्या दिल्ली इव्हेंटमधील फोटो पोस्ट केले आहेत. प्राइम व्हिडिओने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. हा इव्हेंट भारताच्या नेक्स्ट युनिकॉर्नच्या शोधासाठी आयोजित करण्यात आला होता. त्यात भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद देखील उपस्थित होते.

फोटो शेअर करताना आलियाने लिहिले, “दिल्लीला एक झटपट ट्रिप केली आणि #MissionStartAbOnPrime @primevideoin ला पाठिंबा देण्यासाठी मला बोलावले त्यासाठी मनापासून आभार. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, अजय कुमार सूदजी यांच्या भारतात तळागाळातील उद्योजक शोधण्याच्या या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद." इव्हेंटमध्ये आलियाने काळ्या रंगाची साडी नेसली.

आलिया भट, करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT