Alia Bhatt Pregnant  Saam Tv
मनोरंजन बातम्या

आलियाकडून गुडन्यूज, प्रसिद्ध कंडोम कंपनीनं केली भन्नाट पोस्ट, वाचून हसू आवरणार नाही

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई बाबा बनणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई बाबा बनणार आहे. आलियाने आपण आई बनणार असल्याची गोड बातमी 27 जून रोजी सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आलियाच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पाडला. दरम्यान, ड्युरेक्स कंडोम कंपनीने रणबीर-आलियाचे अभिनंदन करणारी एक मनोरंजक पोस्ट शेअर केली आहे. (Alia Bhatt Pregnant Marathi News)

आलिया आणि रणवीरला शुभेच्छा देत, ड्युरेक्स इंडियाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. रणबीरच्या एका सुपरहीट गाण्याच्या ओळी बदलत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘महफिल में तेरी हम तो क्लिअरली नहीं थे’ अशी भन्नाट पोस्ट शेअर करत त्यांनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.

आलिया आणि रणबीर 14 एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. तरी सुद्धा अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. सोमवारी (14 एप्रिल) आलियाने एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली.

'आमचं बाळ लवकरच येत आहे', असे कॅप्शन दिले. आलियानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया-रणबीरच्या चाहत्यांसाठी ही सर्वात आनंदाची बातमी ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

Fat Loss: सुटलेलं पोट होईल झटपट कमी; सकाळी कोमट पाण्यात टाकून प्या हा घरातला फायदेशीर पदार्थ

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

SCROLL FOR NEXT