Alia Bhatt Gal Gadot Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt First Look Of Heart Of Stone: हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटातील आलिया भट्टचा पहिला लुक आला समोर

आलिया भट्टच्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट. आलिया साकारणार आहे किया धवन हे पात्र,इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री (Actress) आलिया भट्ट (Alia Bhatt) काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे. मग ते तिच्या पर्सनल आयुष्यामुळे असो किंवा तिच्या चित्रपटातील कामांमुळे. आलिया तिच्या प्रत्येक चित्रपटात नवीन लुक आणि नवीन भूमिका साकारताना दिसते. स्टुडन्ट ऑफ द इयर मधील शनाया असो किंवा बोल्ड बिनधास्त गंगू. आलियाने तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती ऍक्शन सीन करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या आगामी चित्रपटाची एक झलक आहे. आलियाने हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone)या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात समुद्रकिनाऱ्याजवळील एका रस्त्याने आणि एका वाळवंटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकच्या लॉन्ग शॉटने होत आहे. त्यानंतर एक व्हॉइस ओव्हर येतो, "तुला माहित आहे का तू कोणासाठी साइन अप केलं आहेस- ना मैत्री, ना नाती. आपण जे करत आहोत ते खूप महत्त्वपूर्ण आहे." यानंतर गॅल गॅडोटची (Gal Gadot) या चित्रपटातील पहिली झलक आपल्याला पहायला मिळते.

आलिया भट्टचे काही सीन्स सुद्धा या व्हिडिओमध्ये आहेत ज्यामध्ये आलिया चित्रपटातील (Movies) पात्रांबद्दल सांगत आहे. आलिया किया धवन नावाचे पात्र या चित्रपटात साकारत आहे. आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओला "हार्ट ऑफ स्टोन आणि कियाचा पहिला लुक", असे कॅप्शन देऊन तिने ही माहिती सांगितली आहे. गॅल चित्रपटात एक सीआयए एजेंट रेचेल स्टोनचे पात्र साकारत असून चित्रपटात तिची मुख्य भूमिका आहे. आलियाचा हा लुक तिच्या चाहत्यांना आवडला असून तिला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच तिच्या सहकलाकारांकडून सुद्धा तिचे कौतुक होत आहे.

टॉप हार्पर यांनी हार्ट आॉफ स्टोन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आलिया आणि गॅलसह सोफी ओकेनेडो, पॉल रेडी हे मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २०२३ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT