Alia Bhatt SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्टच्या Ex पर्सनल असिस्टंटला बेड्या, ७७ लाख रूपयांना गंडवल्याचा आरोप

Alia Bhatt Ex Assistant Arrested : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या Ex पर्सनल सेक्रेटरीला अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कायम तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आलिया भट्टच्या Ex पर्सनल असिस्टेंटला (Alia Bhatt Ex Assistant Arrested) अटक करण्यात आली आहे. तिच्यावर 77 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

आलिया भट्टची फसवणूक केल्या प्रकरणात तिची आधीची पर्सनल सेक्रेटरी वेदिका शेट्टीला अटक करण्यात आली आहे. तब्बल 5 महिन्यांच्या शोधानंतर वेदिकाला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वेदिका शेट्टी 2021मध्ये आलियाची पर्सनल सेक्रेटरी होती. तिने बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून 77 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

वेदिका शेट्टीने केलल्या फसवणुकीबाबत जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तिला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. वेदिका शेट्टीचे वय 32 वर्ष आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टी दोन वर्षांहून अधिक काळ हा घोटाळा करत होती. मे 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान करण्यात आली होती.आलिया भट्टची आई अभिनेत्री-दिग्दर्शिका सोनी राजदान यांनी जानेवारीत पोलीसात तक्रार केली.

वेदिका शेट्टी हिच्यावर सुश्री भट्ट यांच्या निर्मिती कंपनी, इटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये 76.9 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. वेदिकाला बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आली असून पाच दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT