Akshaya-Hardik Wedding Instagram @akshayadevdhar_
मनोरंजन बातम्या

Akshaya-Hardik Wedding: 'तुझ्यात जीव रंगता रंगता...' पाठक बाईंनी राणादासाठी घेतला भन्नाट उखाणा

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर विवाहबंधनात अडकले.

Pooja Dange

Akshaya-Hardik Wedding News: 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या विवाह सोहळा पुण्यात मोठ्या राजेशाही थाटात पार पडला आहे. दोघांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहते. या सगळ्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अक्षया देवधर म्हणजे पाठक बाईंनी घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे.

अक्षया देवधरचा भन्नाट उखाणा

खरंतर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त,

पण संधी चालुन आली आहे तर होईन म्हणते व्यक्त.

कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट,

प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट.

मग राणाजी राणाजी म्हणत दिवस गेले सरुन,

राणा सारख्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरुन.

तुझ्यात जीव रंगता रंगता वेळ आली निघायची,

कुठे तरी एक खात्री होती पुन्हा एकत्र भेटण्याची.

दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा,

अक्षयतृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा.

उखाणं घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून,

आता घेते उखाणा ऐका कान देऊन.

उखाण्यासाठी विचार करुन शक्कल लढवलीये अशी,

माझंही नाव घेते तेवढ्यात अक्षया हार्दिक जोशी....

अक्षयाने घेतलेला हा उखाणा तिची मैत्रीण ऋचा आपटे हिने लिहिला होता. या उखाण्यात अक्षयने तिचे सुद्धा नाव घेतले आहे. तिच्या हा उखाण्याचे उपस्थितांनी कौतुक केले आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून तिच्या या उखाण्याला पसंती दर्शवली आहे.

लग्नाच्या दिवशी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर पारंपरिक पेहरावात दिसत आहेत. अक्षयाने नऊवारी साडी नेसली आहे. तसेच हातात हिरवा चुडा आणि तिच्या लूकला शोभेल असे पारंपरिक दागिने घातले होते. हार्दिक सदरा आणि धोतर असा पेहराव केला होता. तसेच गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. दोघांनीही पारंपरिक पद्धतीच्या मुंडावळ्या बांधल्या होत्या. हार्दीक-अक्षयच्या चाहत्यांना त्यांच्या लूक खूपच आवडला आहे. (Wedding)

अक्षय आणि हार्दिक दिल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाधीच्या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. अगदी केळवण, मेहंदी, लग्न अशा विविध कार्यक्रमाचे फोटो दोघांनीही शेअर केले आहेत. तसेच त्यांनी यादरम्याचे काही भाविनक क्षण देखील त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यांच्या या लग्नसोहळ्याला चाहते भरपूर पसंती दर्शवत आहेत. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT