Karan Johar: करण जोहरने केला मोठा खुलसा! 'हा' सुपरस्टार साकारणार बायोपिकमध्ये मुख्य भूमिका

करण जोहरची अशी इच्छा आहे की त्याचे बालपण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात यावे.
Karan Johar Biopic
Karan Johar BiopicSaam Tv
Published On

Karan Johar Biopic News: करण जोहर एक उत्तम दिग्दर्शक आहे. करणने २६ वर्षाच्या वयातच कुछ कुछ होता या या ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. करण जोहरला स्टार्टकिडचा 'गॉडफादर' देखील म्हटले जाते. अनेक स्टारकिड करण जोहरमुळे आज स्टार झाले आहेत. करणला त्याच्या बायोपिकविषयी विचारण्यात आले. त्यावर करणने फारच इंटरेस्टिंग उत्तर दिले.

Karan Johar Biopic
Jubin Nautiyal: जुबिनने चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट, सोशल मीडियावर फॅन्ससह सेलिब्रिटी म्हणतात…

करण जोहावर बॉयोपिक कधी बनणार हे अजून निश्चित झालेले नाही. परंतु जेव्हा करणला विचारण्यात आले की त्याच्या बायोपिकला कोणता अभिनेता न्याय देऊ शकतो. तेव्हा करण म्हणाला रणवीर सिंगच ही भूमिका उत्तमरित्या साकारू शकतो. एका शो दरम्यान करण जोहरला हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी करणने हे उत्तर दिले. (Karan Johar)

करण म्हणाला की, 'मला वाटते की रणवीर सिंग या भूमिकेसाठी योग्य असेल, कारण तो नेहमी रंग बदलत असतो. म्हणूनच रणवीर माझे पात्र चित्रपटामध्ये साकारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल, त्याच्याशिवाय हे कोणीही करू शकत नाही.'

करण जोहरची अशी इच्छा आहे की त्याचे बालपण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात यावे. त्याचे म्हणणे आहे की त्याच्याकडे लहानपणीच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. त्याच्या आई-वडिलांनी त्याला चांगले संस्कार दिले आहेत. करणला त्याच्या लहानपणी कठीण काळ देखील पहिला आहे. मी आता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा स्वतःला आधीपेक्षा अधिक चांगला असल्याचे सांगतो.

करणने कमी वयातच बॉलिवूडमधील 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'माय नेम इज खान'सारख्या उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com