अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपट गाजला; शंभर कोटी रुपयांची कमाई Saam Tv
मनोरंजन बातम्या

अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपट गाजला; शंभर कोटी रुपयांची कमाई

सूर्यवंशी या चित्रपटाने वर्ल्ड वाईल्ड १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी rohit shetty आणि त्याच्या टीममध्ये मोठ्या आनंदाचे वारे वाहू लागले आहेत. त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटाने suryavanshi movie वर्ल्ड वाईल्ड १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊननंतर corona lockdown या चित्रपटाने असे मोठे यश मिळविल्यामुळे बाॅलीवूडमध्ये Bollywood आनंद व्यक्त केला जात आहे.

सूर्यवंशी हा चित्रपट भारतात कोरोनाची लाट येण्याअगोदरच तयार होता. त्याच्या प्रदर्शनाची तारीख देखील ठरली होती. परंतु कोरोना महामारी आली आणि सगळकाही ठप्प करण्यात आले. काही निर्मात्या आणि दिग्दर्शकांनी आपापले चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते. परंतु, सूर्यवंशी हा चित्रपट रोहित शेट्टीने ओटीटीवर प्रदर्शित केला नाही. खरे तर या चित्रपटासाठी भरभक्कम रक्कम मिळत होती.

हे देखील पहा-

परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच बघणे योग्य होते आणि त्या आपल्या अटीवर रोहित शेट्टी ठाम राहिला होता. महाराष्ट्र सरकारने ५० टक्के उपस्थितीत परवानगी देताच त्याने हा चित्रपट दिवाळीच्या धामधुमीत प्रदर्शित केला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३४.३९ कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी ३२.४३ कोटी तर तिसऱ्या दिवशी ३४.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे ही कमाई वर्ल्ड वाईल्ड आहे.

३ दिवसांमध्ये तब्बल १०१. ६६ कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला आहे. महाराष्ट्रात ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असताना देखील हा चित्रपट बहुतेक ठिकाणी हाऊसफुल होता. खरे तर चित्रपटगृहात प्रेक्षक येतील की नाही, अशी भीती निर्मात्यांना होती. परंतु, पुन्हा चित्रपटगृहात प्रेक्षकांना आणण्याची किमया या चित्रपटाने केली आहे. यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आनंदी- आनंद पसरला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT