Tip Tip Barsa Paani Song Remake Saam TV
मनोरंजन बातम्या

Tip Tip Barsa Paani Song Remake : अक्षय-रवीनाच्या 'टिप टिप बरसा' गाण्याचा हटके रिमेक; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Akshay Kumar Ravina Tondon Song Remake : मोहरा चित्रपटातील प्रसिद्ध गाण 'टिप टिप बरसा पानी' आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा रिमेक केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tip Tip Barsa Song Remake Video Viral : ९०च्या काळात अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि रवीना टंडनची(Ravina Tondon) केमिस्ट्री खूप गाजली होती. त्यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' गाण्याने सर्वांना वेड लावले होते. हे गाणं आजही लोकांना आवडतं. हे एक एव्हरग्रीन गाणं आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएनसरने या गाण्याचा रिमेक केला आहे.

अक्षय-रवीनाचा 'मोहरा' चित्रपट तर सर्वांनाच आठवत असेल. चित्रपटातील रवीना टंडन आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटातील प्रसिद्ध गाण 'टिप टिप बरसा पानी'(Tip Tip Barsa Paani)आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा रिमेक केला आहे.

सोशल मीडियावर नेहमीच अनेक गाण्यांच्या रिमेकचे व्हिडिओ पाहायला मिळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अॅमी आणि राज सेजपाल या सोशल मीडिया इन्फ्लुएनसरने हा व्हिडिओ केला आहे.

या व्हिडिओत अभिनेत्रीने खऱ्या गाण्यातील रवीनासारखी पिवळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली आहे. तर मुलाने पांढऱ्या टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. या व्हिडिओत त्यांनी अगदी सेम टू सेम रवीना आणि अक्षय कुमारसारखा डान्स केला आहे .या व्हिडिओत त्यांनी 'टिप टिप बरसा पानी' गाण्याची हूक स्टेपही केली आहे.

या व्हिडिओत स्वतः अक्षय कुमार आणि रवीना असल्याचा भास होत आहे. अगदी हुबेहुब खऱ्या गाण्यासारखाच पाऊस पडताना दिसत आहे. पावसात दोघही चिंब भिजून नाचताना दिसत आहे. डान्सबरोबरच त्यांची केमिस्ट्री अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

९० च्या दशकात रवीना टंडन आणि अक्षय कुमारची जोडी फार गाजली होती. या दोघांच्या 'टिप टिप बरसा पानी' गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. आता या गाण्याचा रिमेकही प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. टिप टिप बरसा पानी या गाण्याची क्रेझ इतकी आहे की, अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' चित्रपटात हे गाणं पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या 'रिमझिम गिरे सावन' या गाण्याचा रिमेक एका वयोवृद्ध जोडप्याने केला होता. या रिमेक गाण्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर अक्षयचा ओह माय गॉड २(Oh My God 2)चित्रपट 11ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT