Akshay Kumar instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: 'भारत माझ्यासाठी सर्वस्व, कॅनडामध्ये फक्त..' अक्षय परदेशातील नागरिकत्वावर जरा स्पष्टच बोलला...

अक्षय कुमारने त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावर खुलेपणाने भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Akshay Kumar: अक्षय कुमारने त्याचे व्यक्तिमत्त्व अॅक्शन आणि कॉमेडी हिरोसारखे बनवले आहे. गेल्या काही वर्षात त्याची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढताना दिसत आहे. केवळ भारतातच नाही तर कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही अक्षयचे चाहते आहेत. सध्या अक्षय कुमार त्याच्या 'सेल्फी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो संपूर्ण टीमसोबत जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अक्षय कुमारने त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावर खुलेपणाने भाष्य केले. त्याच्यासाठी भारतच सर्वस्व आहे, त्यामुळे तो कॅनडाचे नागरिकत्व सोडणार असल्याचे सांगितले आहे.

अक्षयने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, "भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावले आहे, ते मी इथे राहून कमावले आहे. मला पुन्हा एकदा संधी मिळाल्याबद्दल मी फारच स्वत:ला भाग्यवान समजतो. जेव्हा ट्रोलर्स माझ्या नागरिकत्वावर प्रश्न निर्माण करतात, त्यावेळी मला फार वाईट वाटते. त्यांना कोणत्याच गोष्टीची माहिती नसून त्यांना फक्त गोष्ट तयार करता येते."

याच मुलाखतीत अक्षय कुमारने 1990-2000 च्या दशकातील अनेक चित्रपटावरही भाष्य केले आहे, यावेळी तो म्हणतो, अक्षय कुमारचे 15 चित्रपट सतत फ्लॉप झाले होते. बॉक्स ऑफिसवर झालेल्या कमाईवर तो निराश झाला होता. म्हणून अक्षय कुमारने या काळात कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. त्यावेळी त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते.

अक्षय म्हणतो, मी त्यावेळी विचार केला की, "मी केलेले कोणतेच सध्या चित्रपट चालत नसून मला फक्त चित्रपटात काम करावं लागत आहे. मी जॉबसाठी कॅनड्यातही गेलो होतो. तिथे माझा एक मित्र होता. त्याने मला तेथील नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास सांगितला होता. आणि मी तसे केले होते. त्या दरम्यान माझे फक्त दोनच चित्रपट प्रदर्शनाचे बाकी होते, आणि त्याच चित्रपटांनी माझं नशीब पालटलं. त्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप दमदार कमाई केली होती. मी पुन्हा मायदेशी येत जोमानं काम सुरु केले. तेव्हा पासून ते आजपर्यंत मला कधीच मागे वळून पाहण्याची संधी भासली नाही. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे देखील मी विसरलो होतो. हा पासपोर्ट बदलून घ्यावा असे कधीच माझ्या मनात आले नाही. पण आता मी अर्ज केला असून मी लवकरच माझा पासपोर्ट बदलणार आहे."

येत्या २४ फेब्रुवारीला अक्षयचा ' सेल्फी ' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याच्या सोबत चित्रपटात इमरान हाश्मी, नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोबतच अक्षय या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हेराफेरी ३’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये ही झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

SCROLL FOR NEXT