Akshay Kumar Confirms Tiger Shroff Entry in Singham Again  Instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Tiger Shroff: दीपिकानंतर 'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री; अक्षय कुमारने केलं शिक्कामोर्तब

Tiger Shroff in Singham Again: टायगर श्रॉफ 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार, अक्षय कुमारच्या पोस्टने चर्चांना उधाण.

Pooja Dange

Tiger Shroff joins Rohit Shetty's Cop Universe:

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाची सध्या चर्चा आहे. रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्समध्ये अभिनेता अक्षय कुमारची एन्ट्री झाली आहे. सिंघम अगेन'च्या निर्मात्यांनी दीपिका पदुकोणचा लूक पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज दिले. दीपिका पदुकोणच्या 'लेडी सिंघम' लूकने सगळ्यांना चकित केले आहे.

दीपिका पदुकोणची 'सिंघम अगेन'मध्ये एन्ट्री झाल्यानंतर आता अभिनेता टायगर श्रॉफ 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारने पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये 'टायगर श्रॉफ' पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहे. सिक्स पॅक अॅब्स, हातात बंदुका, डोळ्याला गॉगल अशा जबरदस्त लूकमध्ये टायगर दिसत आहे.

टायगर श्रॉफ 'सिंघम अगेन'मध्ये ACP सत्या ही भूमिका साकारणार आहे. टायगरचे फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिले आहे, 'टायगर श्रॉफ माझ्या भावा ACP सत्या म्हणून तुझे आमच्या स्क्वॉडमध्ये स्वागत आहे.'

टायगर श्रॉफचा हा नवीन लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. 'टायगर म्हणजे १००% ऍक्शन' अ शी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तसेच 'सिंघमी अगेन'ची कास्ट दमदार असल्याचं देखील नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. कारण या चित्रपटामध्ये अजय देवगण, रणवीर सिंगसह अक्षय कुमार देखील दिसणार आहे. तसेच आता दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ देखील कन्फर्म झाले आहेत. (Latest Entertainmnet News)

टायगर श्रॉफ 'गणपत' चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये टायगरसह क्रिती सेनन देखील दिसणार आहे. क्रितीला नुकतेच तिच्या 'मिमी' चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT