Akshay Kumar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar : गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमार पोहचला जुहू बीचवर; हातात ग्लोव्हज घालून उचलला कचरा, पाहा VIDEO

Akshay Kumar Beach Cleanup : काल गणपतींचे वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर आज सकाळी अक्षय कुमार जुहू बीच स्वच्छ करताना स्पॉट झाला.

Shreya Maskar

११ दिवसांच्या सावर्जनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे.

अक्षय कुमार गणपती विसर्जनानंतर जुहू बीच स्वच्छ करताना दिसला.

अक्षय कुमारने स्वच्छतेबाबत महत्त्वाचा संदेश दिला आहे.

काल (6 सप्टेंबर)ला ११ दिवसांच्या सावर्जनिक गणपतींचे विसर्जन ( Ganpati Visarjan ) करण्यात आले. यामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रंचड गर्दी पाहायला मिळाली. गणपती विसर्जनानंतर बॉलिवूडचा खिलाडी बीचची स्वच्छता करण्यासाठी आज (7 सप्टेंबर) सकाळी थेट जुहू चौपाटीवर (Juhu Beach Clean Up) पोहचला आहे. त्याच्या बीच स्वच्छतेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) गणपती विसर्जनातील कचरा आणि निर्माल्य उचलून कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये भरताना दिसत आहेत.अक्षय कुमारसोबत या उपक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील सहभागी झाल्या आहेत. तसेच बीएमसीचे अधिकारी देखील दिसत आहेत.

बीच स्वच्छतेच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने सर्वांना खूपच महत्त्वाची गोष्ट सांगितली. अक्षय कुमार म्हणाला की, "स्वच्छता ही केवळ सरकारची किंवा BMC जबाबदारी नाही, तर सर्व जनतेचीही जबाबदारी आहे." गणपती विसर्जनाच्या उत्सवानंतर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड प्रदूषण पाहायला मिळते. त्यामुळे वेगवेगळ्या बीचवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वर्कफ्रंट

अक्षय कुमार लवकरच 'भूत बंगला', 'वेलकम टू द जंगल', 'हैवान' आणि 'हेरा फेरी 3' चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांत (19 सप्टेंबरला 2025) अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा 'जॉली एलएलबी 3' रिलीज होणार आहे. चाहते अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांसाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वांगणी ग्रामीण रुग्णालयात बुरशी लागलेली औषधं, मनसेकडून कडक कारवाईची मागणी

Pune : ८०० स्टॉल, ५० लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी

गुड न्यूज! लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, ३१ व्या हफ्ताचे १५०० रुपये खात्यात जमा

School Holiday: महत्त्वाची बातमी! २७ डिसेंबरला सुट्टी जाहीर; शाळा-कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद

Mumbai Local Train : AC लोकलमधून प्रवास करताना तिकीट असूनही भरावा लागेल दंड; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT