Akshay Kelkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kelkar : तारीख ठरली! अक्षय केळकरची हॉरर मालिका 'या' दिवशी होणार सुरू, वेळ आताच नोट करा

Marathi Serial Timing change : स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे. तर अक्षय केळकरच्या नवीन मालिकेची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Shreya Maskar

अक्षय केळकरच्या 'काजळमाया' मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे.

27 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर मोठे बदल होणार आहे.

27 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर मोठे बदल होणार आहे. नवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तर जुन्या मालिकांची वेळ बदलण्यात येणार आहे. याची माहिती स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. सप्टेंबर महिन्यात नवीन हॉरर मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता मालिकेची रिलीज डेट आणि वेळ जाहीर केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या नवीन हॉरर मालिकेचे नाव 'काजळमाया' (kajalmaya ) असे आहे. या मालिकेत मराठमोळा अभिनेता अक्षय केळकर ( Akshay Kelkar ) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अक्षय केळकर हा 'बिग बॉस 4' चा विजेता (Bigg Boss Marathi Season 4 Winner) राहिला आहे. अक्षयसोबत रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही एक हॉरर मालिका असून यात 300 वर्षांपूर्वीची कहाणी पाहायला मिळणार आहे.

'काजळमाया' तारीख अन् वेळ

अक्षय केळकरची 'काजळमाया' मालिका 27 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

मालिकांची वेळ बदलली

27 ऑक्टोबर पासून तुमच्या आवडत्या मालिकांचे वेळ देखील बदलली आहे. 'तू ही रे माझा मितवा' मालिका रात्री 8 वाजता आणि 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' ही मालिका रात्री 11 वाजता पाहायला मिळणार आहे.

सध्या अनेक मालिकांमध्ये दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रवाह वाहिनीवर दिवाळी विशेष कार्यक्रम पाहायला मिळत आहे. आता नवीन सुरू होणारी मालिका पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Surve: मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेचं वय किती?

Satara Doctor Case: सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, PSI गोपाल बदने पोलिस खात्यातून बडतर्फ

Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

SCROLL FOR NEXT