Anupam kher : ७० वर्षीही भन्नाट एनर्जी अन् हटके स्टाइल; अनुपम खेर 'तौबा तौबा'वर बेफाम होऊन नाचले, पाहा VIDEO

Anupam Kher Dance Video : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या डान्सवर विकी कौशलने खास कमेंट केली आहे.
Anupam Kher Dance Video
Anupam kherSAAM TV
Published On
Summary

अभिनेते अनुपम खेर यांनी 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स केला.

अनुपम खेर यांचा डान्स पाहून विकी कौशलने कौतुक केले.

वयाच्या ७० वर्षी देखील अनुपम खेर यांच्या डान्समध्ये हटके स्टाइल आणि भन्नाट एनर्जी पाहायला मिळते.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam kher) कायम त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे जगभरात दिवाने आहेत. अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर आपली मते मांडतात. अशात नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनुपम खेर यांनी अभिनेता विकी कौशलच्या 'तौबा तौबा' (Tauba Tauba Song) गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. ज्याची रील अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांच्या या रीलवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करत आहे. वयाच्या 70 व्या वर्षी एवढी एनर्जी आणि हटके स्टाइल पाहून चाहते भारावले आहेत. व्हिडीओमध्ये अनुपम खेर 'तौबा तौबा' गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहेत.

बॉस्को-सीजर या प्रसिद्ध कोरिओग्राफर अनुपम खेर यांनी 'तौबा तौबा' गाण्याची हुक स्टेप शिकवताना दिसत आहे. व्हिडीओत अनुपम खेर हुक स्टेपची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. या व्हिडीओला अनुपम खेर यांनी खास कॅप्शन देखील दिले आहे. तसेच व्हिडीओवर कमेंट करत विकी कौशलने (Vicky Kaushal)अनुपम खेर यांचे कौतुक केले आहे. विकी म्हणाला की, "जबरदस्त परफॉर्मन्स सर"

मेट्रो इन दिनों

अनुपम खेर अलिकडेच 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. हा चित्रपट 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता चित्रपट ओटीटीवर देखील उपलब्ध आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो'चा सीक्वल आहे.'मेट्रो इन दिनों' एक रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासोबत अनुपम खेर पाहायला मिळाले. आता चाहते अनुपम खेर यांच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

Anupam Kher Dance Video
'Bigg Boss 19'च्या घरात होणार मिड वीक एलिमिनेशन, ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com