TDM Film On Ajit Pawar
TDM Film On Ajit Pawar  Instagram
मनोरंजन बातम्या

Ajit Pawar On TDM Film: 'टीडीएम'ला स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी, अजित पवारांनी मराठी चित्रपटांबद्दल व्यक्त केली खंत

Chetan Bodke

Ajit Pawar On TDM Film: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊसाहेब कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ चित्रपट गेल्या २८ एप्रिलला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सध्या ‘टीडीएम’ चित्रपटाची सोशल मीडियावर एक अनोखीच क्रेझ आहे. चित्रपटाला हवे तशा थिएटर स्क्रिन मिळत नसल्याने दिग्दर्शकांसह कलाकार थिएटरमध्ये त्यांचे अश्रु अनावर झाले होते. कलाकारांनी थेट थिएटरमध्ये जाऊन कलाकारांसमोर हात जोडून कलाकृती पहावी अशी विनंती केली. मराठी सिनेमांना मिळत नसलेल्या स्क्रिन्सचा प्रश्न सध्या बराच चर्चेत आहे.

मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या मदतीला यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धावून आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांनी ट्विट करत TDM चित्रपटाला स्क्रिन उपलब्ध करून देण्याचे आवाहन केलं आहे.

‘टीडीएम’ चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली असताना, पुण्यात ‘टीडीएम’ चे शो हाउसफुल आहेत. पण अनेक प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा चित्रपट पाहण्याची इच्छा असतानाही केवळ कमी शो असल्याने ‘टीडीएम’ प्रेक्षकांना पाहता येत नाहीये. आज नुकतंच ‘टीडीएम’ चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि मुख्य कलाकार कालिंदी निस्तने आणि पृथ्वीराज यांनी प्रेक्षकांना हात जोडून ही दयनीय अवस्था सांगितली. (Marathi Film)

सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय, परंतु शो नसल्याने प्रेक्षकांना माघारी जावं लागतंय. या अवस्थेमुळे सर्व टीमच्या डोळ्यात पाणी आलं. “आमच्यावर प्रेशर आहे.” असं म्हणत थिएटर मालकांनी हात वर केलेत. आता थिएटर मालकांवर नेमकं कसलं प्रेशर आहे, ही माहिती अद्याप तरी, गुलदस्त्यात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अजित पवार यांनी ट्विट करत याची तीव्र नाराजी व्यक्त केली.

ट्वीट करत अजित पवार म्हणतात, “राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.”

अजित पवार यांनी केलेल्या या ट्विटची दखल संबंधित थिएटर मालक घेणार का? आणि TDM सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवे तितके स्क्रिन उपलब्ध होणार का ? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

चित्रपटाबाबत आज कलाकारां आधीच प्रेक्षकांनीच पुढाकार घेत शो का नाहीत अशी विचारणा केली. या संपूर्ण चित्रावर 'टीडीएम' चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झालेत. यावेळी बोलताना भाऊराव म्हणतात, “आज 'टीडीएम' चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. ”

“चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एकच शो होता, काल दोन शो होते चित्रपट गृह तुडुंब भरलेले असताना ही वाढवून शो दिलाच नाही. लोकांना चित्रपट पाहायचाय त्यांची मागणी आहे, म्हणून मी स्वतः थेटर मालकांजवळ विचारपूस केली तर त्याच असं म्हणणं आहे की एकच शो लावा असा वरून प्रेशर आहे. माझ्या चित्रपटाला जे शो मिळाले आहेत ते पण प्राईम टाईम मधील नसून ऑड टाईममधील आहेत, आणि ऑड टाईम असल्यामुळे प्रेक्षकांना त्या वेळेत तिथवर पोहोचणं शक्य नाही आहे आणि हे सर्व पाहून आम्हाला खूप त्रास होतोय. माझा चित्रपट नसेल आवडला तर स्पष्ट मला लोकांनी सांगावं की, तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस त्या दिवशी मी सिनेमा निर्मितीच काम बंद करेन” असं म्हणत भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT