Son Of Sardaar 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Son Of Sardaar 2 Release Date : अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'ची तारीख बदलली, 'या' चित्रपटासोबत होणार कांटे की टक्कर

Son Of Sardaar 2 Release Date Postponed : अजय देवगन आणि मृणाल ठाकूरच्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn ) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2'मुळे (Son Of Sardaar 2) चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता या चित्रपटासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 'सन ऑफ सरदार 2'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप यश मिळत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा'ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 45 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी 'सन ऑफ सरदार 2'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

'सन ऑफ सरदार 2'मधून अजय देवगन आणि मृणाल ठाकुर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांची गाण्यातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'पीव्हीआर सिनेमा'ने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून 'सन ऑफ सरदार 2' ची तारीख बदल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.

'सन ऑफ सरदार 2' रिलीज डेट काय?

आता 'सन ऑफ सरदार 2'सोबत 1 ऑगस्टला सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीचा 'धडक 2' चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सन ऑफ सरदार 2' चित्रपट आधी 25 जुलै 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 1 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

'सन ऑफ सरदार 2'

अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटात भरपूर ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. 'सन ऑफ सरदार 2' हा 2012 साली रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूर , नीरू बाजवा, विंदू दारा सिंह, रवी किशन आणि शरत सक्सेना हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: गुप्तांगात मिरची पावडर टाकली, उलटं लटकून मारहाण; पोलिसांचे 4 तरुणांसोबत भयंकर कृत्य

Air Plane Crash: उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाच्या इंजिनला आग; पाहा थरारक VIDEO

Pune Ganeshotsav Special Trains : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव स्पेशल गाड्या; कुठे थांबणार? तारीख, वेळ जाणून घ्या...

नोकरीची भूलथाप, अत्याचार अन् अश्लील फोटो, भाजपमध्ये प्रवेश केलेला नेता अडकला; राजकीय वर्तुळात खळबळ

Pakistan flood : पाकिस्तानात पुराचा कहर; २० दिवसांत २०० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT