Highest Paid OTT Actors In India: कोविड-१९ नंतर ओटीटी विश्व विस्तारले आहे. आता मोठ्या संख्येने प्रेक्षकांना ओटीटीवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यास आवडतात. प्रेक्षक घरी बसून कुटुंबासह ओटीटीवर चित्रपटांचा आनंद घेतात. अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीविश्वात प्रवेश केला आहे. या यादीत अजय देवगणपासून जयदीप अहलावतपर्यंतची नावे आहेत. पण OTT वर कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो जाणून घेऊयात.
अजय देवगण
अजय देवगण गेल्या ३ दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉटस्टारच्या 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या वेब सिरीजसाठी अभिनेत्याने १२५ कोटी रुपये घेतले. या वेब सिरीजद्वारे त्याने ओटीटीविश्वात प्रवेश केला.
जयदीप अहलावत
जयदीप अहलावतने अनेक ओटीटी चित्रपट वेब सिरीजमध्ये काम केले आहे. यांमध्ये थ्री ऑफ अस, महाराज, पाताल लोक आदींचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता एका ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी २० कोटी रुपये घेतो. अलिकडेच त्याच्या पाताल लोकचा दुसरा सीझन रिलीज झाला.
सैफ अली खान
सेक्रेड गेम्स आणि तांडव सारख्या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये काम केलेल्या सैफ अली खानने ओटीटीच्या जगात स्वतःचे नाव कमावले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता एका ओटीटी प्रोजेक्टसाठी १५ कोटी रुपये घेतो.
पंकज त्रिपाठी
मिर्झापूर फ्रँचायझीमध्ये कालीन भैयाच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले पंकज त्रिपाठी हे ओटीटी जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. हा अभिनेता एका ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी १२ कोटी रुपये घेतो.
करिना कपूर
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी १०-१२ कोटी रुपये फी घेते. करीना ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.