Ishita Datta And Vatsal Sheth Baby News Instagram
मनोरंजन बातम्या

Ishita Dutta Baby: अजय देवगणच्या ऑन स्क्रिन लेकीनं दिली गुड न्यूज, नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Ishita Dutta And Vatsal Sheth News: अभिनेत्री इशिताने बुधवारी गोंडस बाळाला जन्म दिला.

Chetan Bodke

Ishita Dutta And Vatsal Sheth Baby News: ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्त नेहमीच आपल्या अभिनयाकरिता चर्चेत असते. पण यावेळी अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. १९ जुलै अर्थात काल इशिता दत्तने आपल्या चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. इशिता दत्त आणि पती वत्सल शेठ हे दोघेही आता आई- बाबा झाले असून त्यांनी काल आपल्या गोंडस बाळाचे स्वागत केले आहे.

ई.टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्री इशिताने बुधवारी (१९ जुलै) रोजी गोंडस बाळाला जन्म दिला असून अभिनेत्री पुढील ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात असणार आहे. आई आणि तिचं गोंडस बाळ दोघेही बरे असून अभिनेत्रीला शुक्रवारी (२१ जुलै) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

अभिनेत्रीने गोड बातमी दिल्यानंतर इशिता आणि पती वत्सलचे कुटुंबीय कमालीचे आनंदीत आहे. इशिता गरोदरपणाच्या काळात चाहत्यांसोबत सोशल मीडियावर कमालीची सक्रिय होती. इशिताने गरोदरपणाच्या काळात अनेकदा बेबी बंप आणि पती वत्सलसोबतचे अनेक सेल्फी शेअर केल्या होत्या.

अभिनेत्री इशिता दत्त आणि अभिनेता वत्सल शेठ यांनी २८ नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने ३१ मार्च २०२३ रोजी आपल्या चाहत्यांसोबत प्रेग्नेंट असल्याची माहिती शेअर केली होती. काही दिवसांपूर्वी इशिताने काही दिवसांपूर्वी बेबी शॉवरचे फोटो देखील शेअर केले होते. तिच्या बेबी शॉवरच्या फोटोंवर आणि व्हिडिओवर चाहत्यांनी पसंदी दर्शवली आहे.

यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. यामध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. बेबी शॉवरचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, ‘गोदभराई फंक्शन. या काही क्षणांसाठी, हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे आभार.’ अभिनेत्रीच्या या पोस्टवर इशिता दत्ता आणि वत्सल शेठ आई- वडिल झाल्याने दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT