Instagram @ajaydevgn
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn Property In Mumbai : अजय देवगणने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता

Pooja Dange

Ajay Devgn Buys 5 Units For Office In Mumbai : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने 2021 मध्ये मुंबईतील जुहू येथे 47.5 कोटीचा एक आलिशान बंगला खरेदी केला होता. आता, जवळपास दोन वर्षांनंतर, त्याने 45.09 कोटींचे पाच ऑफिस युनिट्स खरेदी केले आहेत.

डेटा विश्लेषक फर्म 'सीआरई मेट्रिक्स'नुसार, अजय देवगणने अंधेरी पश्चिम भागात ही नवीन गुंतवणूक केली आहे. या पाच कार्यालयीन युनिटचे एकूण क्षेत्रफळ १३,२९३ चौरस फूट आहे.

अजय देवगणची ही नवीन मालमत्ता वीर देसाई रोडला लागून असलेल्या ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये आहे. अभिनेत्याने ही मालमत्ता वीर सावरकर प्रोजेक्ट नावाच्या विक्रेत्याकडून विकत घेतली आहे. (Latest Entertainment News)

या पाच कार्यालयीन युनिटपैकी तीन युनिट सिग्नेचर इमारतीच्या 16व्या मजल्यावर आहेत जे 8,405 चौरस फूट इतके आहेत. त्याची किंमत 30.35 कोटी रुपये असून त्यासाठी अजय देवगणने 1.82 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

याच इमारतीच्या 17व्या मजल्यावर अजय देवगणने आणखी दोन ऑफिस युनिट्स विकत घेतले आहेत, जे 4,893 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहेत. त्याची किंमत 14.74 कोटी रुपये आहे आणि अभिनेत्याने त्यासाठी 88.44 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. कागदपत्रांनुसार, अजय देवगणने 19 एप्रिल 2023 रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी केली होती.

या पाच कार्यालयीन युनिटची नोंदणी तसेच कार्यालयाची कागदपत्रे विशाल वीरेंद्र देवगणच्या नावाने आहे. विशाल वीरेंद्र देवगण हे अजय देवगणचे खरे नाव आहे. मोठ्या पडद्यावर तो अजय या नावाने ओळखला जातो.

काही दिवसांपूर्वीच अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोलनेही मुंबईत 16.5 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले होते. अपार्टमेंट 2,493 चौरस फूट इतके असून चार कार पार्किंग देखील आहे. काजोलने एप्रिल महिन्यातच भारत रिअॅलिटी व्हेंचर्सकडून ही मालमत्ता खरेदी केली आहे. त्याची नोंदणी 13 एप्रिल 2023 रोजी झाली आहे.

यापूर्वी 2021 मध्ये अजय देवगणने जुहू परिसरात 474.4 स्क्वेअर मीटरचा आलिशान बंगला खरेदी केला होता. सध्या या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अजय देवगणने या बंगल्यासाठी 47.50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यासाठी त्यांनी 18.75 कोटी रुपयांचे बँकेचे कर्जही घेतले आहे. ही मालमत्ता कपोले सहकारी गृहनिर्माण संस्थेचा एक भाग आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rekha: 'मी प्रेमाला नाही तर 'Bigg B'ला घाबरते', रेखाने केला मोठा खुलासा Video Viral

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

Marathi News Live Updates : हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर आता नितेश राणे संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

Emotional Girls: या मुली असतात फारच हळव्या, जरा काही बोल्लं की लगेच रडतात

SCROLL FOR NEXT