Ajantha Verul International Film Festival Saam Tv
मनोरंजन बातम्या

९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरूवात, जगभरातील ५५ चित्रपटांची मेजवाणी

9 th Ajantha Verul International Film Festival: या महोत्सवाचे उद्घाटन आज संभाजीनगर येथील एमजीएम परिसरातील रूक्मीणी सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत हजेरी लावणार आहेत.

Priya More

Chhatrapati Sambhaji Nagar:

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यां सिनेरसिकांसाठी ही बातमी महत्वाची आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मारठवड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ३ जानेवारी म्हणजे आजपासून सुरूवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज संभाजीनगर येथील एमजीएम परिसरातील रूक्मीणी सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत हजेरी लावणार आहेत.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत आहे. प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. हा चित्रपट महोत्सव एनएफडीसी आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेली हंट डिजीटल पार्टनर आहेत. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँण्ड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम ९०.८ हे रेडिओ पार्टनर आहेत.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन आज सायंकाळी ७.३० वाजता रूक्मीणी सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द गीतकार आणि पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, फिल्मसिटी मुंबईचे उप व्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांची उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली जर्मन भाषेतील फिल्म फॉलन लिव्हस फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल. उद्घाटन सोहळ्यात सर्वांसाठी प्रवेश खुला असणार आहे.

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील ९ सिनेमांचा समावेश असून ५ राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक आणि १ लाख रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

असे असणार अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील कार्यक्रम -

- ४ जानेवारी २०२४ - दुपारी २ वाजता आयनॉक्स येथे 'पा', 'चिनी कम', 'घुमर', 'शामीताभ', 'पॅडमॅन' या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आर.बाल्की यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- ४ जानेवारी २०२४ - सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ गीतकार आणि संवाद लेखक पद्मश्री जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्यासोबत संवाद साधतील.

- ५ जानेवारी २०२४ - दुपारी २ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे 'आर्टिकल १५', 'थप्पड', 'रा-वन', 'मुल्क' या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- ६ जानेवारी २०२४ - दुपारी २.३० वाजता केंद्र शासन-पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदुम यांच्या गांधी आणि सिनेमा या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- ६ जानेवारी २०२४ - सायंकाळी ६.३० वाजता मीट द डिरेक्टर्स या सत्रात भारतीय सिनेमा गटातील सर्व दिग्दर्शकांसमवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्रपट रसिकांना या सिनेमांच्या दिग्दर्शकांसमवेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधता येईल

- ७ जानेवारी २०२४ - दुपारी १२ वाजता ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक ध्रृतीमान चॅटर्जी यांच्या मृणाल सेन समजून घेताना या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महान चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांमधून श्री.चॅटर्जी यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT