Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात अभिषेक कुमारचा ताबा सुटला, ईशाच्या समोरच समर्थच्या कानाखाली मारली; नेमकं कारण काय?

Abhishek Kumar Slap Samarth Jurel: ईशा आणि समर्थ हे दोघे जण अभिषेकला सतत काहीना काही मुद्द्यावरून डिवचताना दिसत आहेत. या दोघांनी अनेक वेळा अभिषेकला त्याच्या फॅमिलिवरून आणि त्याच्या पास्टवरून कमेंट्स केल्या आहेत.
Abhishek Kumar Slap Samarth Jurel
Abhishek Kumar Slap Samarth JurelSaam Tv
Published On

Bigg Boss 17 Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस १७' ला (Bigg Boss 17) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. दिवसेंदिवस हा शो खूपच रंगतदार होत चालला आहे. घरातील सर्वच कंटेस्टंट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहेत. अशामध्ये घरातील सदस्य ईशा मालवीय (Isha Malviya), समर्थ जुरेल (Samarth Jurel) आणि अभिषेक कुमार (Abhishek Kumar) यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे.

ईशा आणि समर्थ हे दोघे जण अभिषेकला सतत काहीना काही मुद्द्यावरून डिवचताना दिसत आहेत. या दोघांनी अनेक वेळा अभिषेकला त्याच्या फॅमिलिवरून आणि त्याच्या पास्टवरून कमेंट्स केल्या आहेत. अशामध्ये या दोघांच्या सततच्या अशा वागण्याला कंटाळून अभिषेक कुमारचे नियंत्रण सुटते आणि रागाच्या भरामध्ये तो समर्थच्या अंगावर धावून जात त्याच्या कानाखाली मारतो. अभिषेकने समर्थवर हात उचलल्यामुळे घरातील इतर सदस्यांना मोठा धक्का बसतो. बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडलं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, विकी जैन, अभिषेक कुमार किचन एरियामध्ये बसलेले असतात. अंकिता देखील तिथेच असते. त्याचवेळी समर्थ त्याठिकाणी येतो आणि विकीसोबत अभिषेकबाबत बोलण्यास सुरूवात करतो. तो म्हणतो की, 'एखाद्यावर चोमूचा स्टॅम्प लागला ना तर तो तेच असतो.' त्यानंतर समर्थ आणि अभिषेक आमने-सामने येतात. समर्थ अभिषेकला वडिलांवरून वाईट भाषेत बोलतो. त्यावर अभिषेक त्याला म्हणतो की, 'वडिलांवर जाऊ नको.' या भांडणात ईशा देखील एन्ट्री घेते. ईशा म्हणते की, 'किती अॅक्टिंग करतो हा. तुझे आई-वडील देखील तुला वैतागले आहेत.' ईशा आणि अभिषेकमध्ये वाद सुरू असतो. तेवढ्यात समर्थ अभिषेकच्या चेहऱ्याला हात लावतो. अभिषेकला प्रचंड राग येतो आणि तो समर्थच्या तोंडावर जोरात चापट मारतो.

समर्थ, अभिषेक आणि ईशाच्या या वादामुळे घरातील वातावरण खराब होते. अभिषेकने समर्थला कानाखाली मारल्यामुळे घरातील इतर सदस्यांना मोठा धक्का बसतो. अरुण, आउरा, अंकिता लोखंडे हे सर्वजण अभिषेकला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर ईशा मात्र अभिषेकला जोरजोरामध्ये ओरडण्यास सुरूवात करते. आता अभिषेकच्या या वागण्यावर बिग बॉस आणि सलमान खान त्याला नेमकी काय शिक्षा देणार हे येणाऱ्या एपिसोडमध्येच समजेल.

Abhishek Kumar Slap Samarth Jurel
Arbaaz Khan Unfollow Malaika Arora: शूराशी लग्न केल्यानंतर अरबाज खानने बदलले रंग, एक्स वाइफ मलायका अरोराला केलं अनफॉलो

अभिषेकचे हे वागणं जरी चुकीचे असले तरी देखील त्याला अनेकांनी सपोर्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर सपोर्ट अभिषेक कुमार असा टॅग चालत आहे. अनेक सेलिब्रिटींनी अभिषेकला सपोर्ट केला आहे. रितेश देशमुख, प्रिंस नरुला यासारख्या सेलिब्रिटींनी अभिषेकला सपोर्ट करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तर नेटिझन्सनी देखील अभिषेकला सपोर्ट करत ईशा आणि समर्थचा विरोध केला आहे. ईशा आणि अभिषेक पोकिंगच्या सर्व मर्यादा क्रॉस करत आहेत. या दोघांविरोधात बिग बॉसने कारवाई केली पाहिजे. कारण यांच्यामुळे अभिषेकच्या मेंटल हेल्थवर परिणाम होत असल्याचे काही नेटिझन्सचे म्हणणे आहे.

Abhishek Kumar Slap Samarth Jurel
Ira Khan Wedding: कोण आहे आमिर खानचा होणारा जावई, तो नेमका काय करतो?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com