Aishwarya Rai SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai : 'क्वीन पुन्हा कामावर...' ऐश्वर्या राय अन् मेकअप आर्टिस्टचा 'तो' फोटो व्हायरल

Aishwarya Rai Viral Photo : अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मात्र अशात ऐश्वर्याचा मेकअप आर्टिस्टसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या सोशल मिडियावर बच्चन कुटुंब चांगलेच चर्चेत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मिडियावर रंगल्या आहेत. अशात आता ऐश्वर्या रायचा मेकअप आर्टिस्टसोबतचा एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या रायचा तिच्या नव्या चित्रपटाच्या सेटवरूनचा जबरदस्त सेल्फी व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती मेकअप आर्टिस्टसोबत दिसत आहे. हा फोटो सोशल मिडियावर तिच्या मेकअप आर्टिस्टने शेअर केला आहे. त्याने या फोटोला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "शेवटी आमची राणी कामावर परतली...खूप आनंद..." या फोटोवर तुफान लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

ऐश्वर्या रायचा हा नवा प्रोजेक्ट कोणता याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. तसेच तिचे एका जाहिरातीसाठी हे शूट चालले आहे. अशी चर्चा देखील सोशल मिडियावर चांगली रंगली आहे.

ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या रायने अलीकडेच एका कार्यक्रमात आपल्या नावापुढे असलेले बच्चन आडनाव हटवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या नात्यात खरच काहीतरी बिघडलं असल्याच्य चर्चांना उधाण आले आहे. ऐश्वर्याचा नवीन चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT