'Ponniyin Selvan 2' Aishwarya Rai Bachchan Fees Instagram @aishwaryaraibachchan_arb
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan Movie: २५० कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पोन्नियिन सेलवन 2’साठी ऐश्वर्या रायने देखील घेतलं तगडं मानधन

Aishwarya Rai Bachchan Fees: ऐश्वर्याने या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी १० करोड घेतल्याचे म्हटले जाते.

Pooja Dange

For 'Ponniyin Selvan 2' Aishwarya Rai Bachchan Fees: चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेलवन 2’ आज प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट तामिळ आणि हिंदीसह अजून पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पोन्नियिन सेलवन 2’ची कथा महान चोळ सम्राट राजा चोळवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात देखील चित्रपटाची कथा या राजाच्या अवतीभोवती फिरत होती. दुसऱ्या भागात देखील हिच कथा पुढे जाणार आहे.

‘पोन्नियिन सेलवन’ और ‘पोन्नियिन सेलवन 2’ या दोन्ही चित्रपटांचे बजेट भरमसाट होतं. चित्रपटाच्या पहिल्या भागावर निर्मात्यांनी २५० कोटींचा खर्च केला होता. या चित्रपटाचा एकच भाग प्रदर्शित होणार होता. ज्याचे बजेट ५०० कोटी होते. परंतु निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला. तर या दोन्ही चित्रपट बनवायला ५०० कोते लागले. (Latest Entertainment News)

मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटाच्या दोन्ही भागात ऐश्वर्या राय प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्याने मानधन देखील तगडे घेतले आहे. ऐश्वर्याने या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी १० करोड घेतल्याचे म्हटले जाते. तर दुसऱ्या भागासाठी तिने तिच्या मानधनात वाढ केली. ऐश्वर्या रायने ‘पोन्नियिन सेलवन 2’साठी १२ करोड रुपये घेतले.

साउथ अभिनेता विक्रेम म्हणजेच चियानने ‘पोन्नियिन सेलवन 2’ साठी ऐश्वर्या राय इतकेच मानधन घेतले आहे. PS2 मध्ये पार्थिबेंद्र पल्लवन भूमिका साकारणार अभिनेता विक्रेमने १२ कोटी इतके मानधन घेतले आहेत.

‘पोन्नियिन सेलवन 2’मध्ये तृषा कृष्णनने साकारलेल्या कुंदवई या पात्रासाठी ३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर ऐश्वर्या लक्ष्मीला पूंगुझाली या भूमिकेसाठी १.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. दोन्ही अभिनेत्रींनी उत्तम काम केले आहे. जे प्रेक्षकांना देखील आवडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT