Aishwarya Narkar Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar Dance: बंगाली साडी अन् पारंपारिक सांजश्रृगांर करत ऐश्वर्या नारकरचा तमिळ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते म्हणाले....

Aishwarya Narkar Bangali Look: ऐश्वर्या नारकर यांनी बंगाली लूक केला आहे. बंगाली साडीमधला त्यांच्या डान्सने भुरळ घातली आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या नृत्यशैलीमुळे कायमच लक्ष वेधून घेतात. अभिनयाव्यतिरिक्त ऐश्वर्या नारकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असतात. ऐश्वर्या नारकर या पती अविनाश नारकरसोबत नेहमीच नवनवीन डान्सचे व्हिडीओ पोस्ट करतात.सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे . त्यांचे डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी नवीन रिल शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऐश्वर्या नारकर यांनी बंगाली लूक केला आहे. बंगाली साडीमधला त्यांच्या डान्सने भुरळ घातली आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी रायन चित्रपटातील 'ए. आर. रेहमान' यांच्या 'वॉटर पॅकेट' या गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांच्या डान्स व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंतीस दिली आहे. नेटकऱ्यांनी त्यावर 'खूप सुंदर', 'तुमची एनर्जी कमाल आहे', 'कडक' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी विरोचकाची भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट येणार असून विरोचकाचा अंत झाल्यानंतर ऐश्वर्या नारकरची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

ठरलं! महाराष्ट्राला उद्या नवीन उपमुख्यमंत्री मिळणार, संध्याकाळी 5 वाजता शपथविधी|VIDEO

विकेंडला प्रवाशांचे हाल होणार; मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT