गुजरातमधून एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात Air India चे विमान कोसळ्याचे वृ्त्त समोर आले आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. तसेच या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असताना, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख अशा अनेक अभिनेत्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताने संपूर्ण भारत हादरला आहे. या विमानामध्ये २४२ जण होते. त्यातील १२ क्रू मेंबर्स होते अशी माहिती व्हायरल होत आहे. या विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच अपघात झाला. अपघात स्थळावरून काळा धूरही निघताना पाहायला मिळाला. हे एक आंतरराष्ट्रीय विमान होते. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि शक्य तितक्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याच प्रसंगावर अभिनेत्यांनी ट्विट केले आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने ट्विट केले की, 'Air India चे विमान क्रेश झाल्याची बातमी ऐकूनच मला मोठा धक्का बसला, मी निशब्द झालो. यावेळी त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हाच मदतीचा मार्ग ठरेल'. तर दुसरीकडे अभिनेता रितेश देशमूख म्हणाला, ' Air India च्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी ऐकन मी थक्क झालो. मी प्रवाशांच्या कुटूंबीयांचे दु:ख समजू शकतो. हदय पिळवटून टाकणारा हा अपघात झाला आहे. या कठीण काळात मी देवाकडे प्रवाशांसाठी प्रार्थना करतो.' अशा प्रकारे अनेक अभिनेत्यांनी स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे.
संपुर्ण माहिती
अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षाने सांगितले की, गुरुवार १२ जून रोजी उड्डाणानंतर काही मिनिटांनी दुपारी १.४० वाजचा हे विमान कोसळले आहे. अपघातग्रस्त विमान बोईंग ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे. मेघानी नगर परिसरात हे विमान कोसळले आहे. अपघातानंतर ७ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त करत दिली.