Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला कामाचा खूप थकवा आला असेल आणि तुमच्याकडे फिरण्यासाठी जास्त दिवस नसतील तर हा प्लान वाचा.
पुण्याहून सकाळी ६ ला घरातून नाश्ता घेऊन निघा.
पुढे खंबाटकी घाटावर तुम्ही ७.३० पर्यंत पोहोचाल. तिथे तुम्ही नाश्ता घेऊ शकता.
पुढे तुम्हाला ८.३० दरम्यान वडा पाव, मिसळ आणि वाईचे प्रसिद्ध पेढ्यांचा आस्वाद घेता येईल.
धोल्याचा गणपती, काशी विश्वेश्वर मंदिर अशी ठिकाणे फिरू शकता.
१० च्या सुमारास तुम्ही धोम धरणाचे सुंदर बॅकवॉटर दृश्य, फोटोसाठी वेळ आणि बोट राईडचा आनंद लुटू शकता.
सिद्धेश्वर मंदिराच्या सभोवताली शांत परिसर, ध्यानधारण व थोडी विश्रांती घ्या.
पुढे मेणवली तिथले वाडे फिरून दुपारचे जेवण बंदू गोरे भोजनालयात करू शकता. तुम्हाला वाईमध्ये तुम्हाला खूप हॉटेल्सचे ऑपशन मिळतील.
पुढे २.३० दरम्यान घोडेसवारी, फोटोग्राफी, थोडं चालणं, वाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी टेबल लॅन्ड पंचगणीत मनसोक्त फिरा.
परत पुण्याकडे खंबाटकी घाट मार्गे प्रवास करा.