'अग्गबाई सूनबाई': शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मॅडी झाली भावुक Saam Tv
मनोरंजन बातम्या

'अग्गबाई सूनबाई': शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मॅडी झाली भावुक

अग्गबाई सूनबाई" ही छोट्या पडद्यावर सध्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या, मालिकांमधील एक मालिका म्हणून चर्चेत आहे. या मालिकेचा उत्तरार्ध सुरू होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : "अग्गबाई सूनबाई" Aggabai Sasubai ही छोट्या पडद्यावर सध्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या, मालिकांमधील एक मालिका serial म्हणून चर्चेत आहे. या मालिकेचा उत्तरार्ध सुरू होत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा audience निरोप घेणार आहे. परिणामी मालिकेमधील मॅडी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी Bhakti Ratnaparkhi खूपच भावूक झाली होती. तिने इन्स्टाग्रामवर Instagram एक पोस्ट लिहून, आपला अनुभव त्यामध्ये व्यक्त केला आहे.

हे देखील पहा-

आज अग्गंबाई सूनबाईमध्ये माझा शेवटचा सीन आहे. म्हणजे मॅडीचा. अग्गंबाई सासूबाई पासून हा प्रवास सुरू झालेला होता. मी खूप नशिबवान आहे की, मला मॅडी हे इतक गोड पात्र साकारायला मिळाले आहे. तिचा निरागसपणा, तिचा वेडेपणा मला जगायला आणि अनुभवायला मिळाला आहे. कशाचाही जास्त विचार न करणारी, सगळ्यांवर भरभरून नि:स्वार्थी प्रेम करणारी, सगळ्यांशी मैत्री करणारी आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारी, आपल्या मधील लहान मूल नेहमी जपून ठेवणारी, इतकी निरागस मॅडी आता मला परत करायला नाही मिळणार, याचे खूप वाईट वाटतं आहे.

मॅडीवर सगळ्यांनी खूप प्रेम केले आहे. तुमच्या सर्वांचे त्याकरिता खूप आभार. निवेदिता सराफ ताई Nivedita Saraf Tai, गिरीश ओक Girish Oak ​सर तुमच्याबरोबर मला कधी काम करायला मिळेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. मोहन जोशी सर तुमचे आशीर्वाद असेच राहु देत आणि तुमच्यासोबत काम करण्यासाठी संधी मला परत मिळू दे. उमा खूप मज्जा आली, तुझ्याबरोबर काम करून, खूप सुंदर काम केलंस तू. अद्वैत.. खूप कमी सीन्स होते आपले. परंतु, जे काही सीन्स होते. त्यामध्ये मज्जा आली खूप. परत भेटू.. लवकरच.. एका नवीन भूमिकेमध्ये टीआरपी घसरल्यामुळे वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवेदिता सराफ, गिरीश ओक, उमा पेंढारकर, अद्वैत दादरकर, मोहन जोशी हे मुख्य भूमिका साकारले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

SCROLL FOR NEXT