व्हिडीओ अल्बमच्या शूटिंग दरम्यान मॉडेलचा विनयभंग करुन बदनामी

एका २५ वर्षीय माॅडेलचा विनयभंग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या बाबत दिल्लीचा रहिवाशी असलेल्या साहिल कपूर या व्हिडिओ निर्मात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
माॅडेलचा व्हिडिओ निर्मात्याकडून विनयभंग
माॅडेलचा व्हिडिओ निर्मात्याकडून विनयभंगTwitter @SakalMediaNews
Published On

मुंबई : एका २५ वर्षीय माॅडेलचा Model विनयभंग Molestation करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या बाबत दिल्लीचा New Delhi रहिवाशी असलेल्या साहिल कपूर या व्हिडिओ निर्मात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लवकरच त्याचा जबाब पोलिस Police नोंदविणार आहेत. Model Molested by Video Producer

२५ वर्षांची ही मॉडेल अंधेरीतील Andheri यमुनानगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहते. तिने एक व्हिडीओ अल्बम Video Album बनविण्यासाठी साहिल कपूरची मदत घेतली होती. ९ फेब्रुवारीपासून या अल्बमचे भिवंडीतील नाशिक हायवेजवळील एका स्टुडिओमध्ये शूटींग सुरु झाले होते. शूटींगदरम्यान साहिल कपूरने या मॉडेलशी अश्‍लील संवाद साधून तिचा विनयभंग केला होता.

हे देखिल पहा

तसेच तिच्या राहत्या घरीही त्याने तिच्याशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिने स्वतच्या अल्बमसाठी सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च केला होता. त्यामुळे या अल्बमचे सर्व कॉपीराईट हक्क तिच्याकडे होते. असे असताना साहिलने अल्बमच्या गाण्याचे फुटेज एका पेनड्राईव्हमध्ये नेले होते, तिची परवानगी न घेता गाण्यांचे कॉपीराईट स्वतच्या नावावर करुन परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती, अशी तक्रार या माॅडेलने दिली आहे.

माॅडेलचा व्हिडिओ निर्मात्याकडून विनयभंग
तिवसा येथे शिवसेना शहर प्रमुखाची हत्या

१९ मेला त्याने एका नामांकित म्युझिक कंपनीला मेल करुन तिच्या अल्बमचे कॉपीराईट त्याच्याकडे आहे, त्यामुळे हा अल्बम त्याच्या परवानगीशिवााय रिलीज करु शकत नाही असे सांगून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात साहिल कपूरविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती, या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर साहिल कपूरविरुद्ध पोलिसांनी ३५४, ४०६, ४२०, ४०९, ५०९, ५०० भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. साहिल हा दिल्लीतील राणीबाग, विकास प्लाझा, डीडीए कमर्शियल कॉम्पेसजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहतो, लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Edited By- Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com