तिवसा येथे शिवसेना शहर प्रमुखाची हत्या

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिर्वाद वाईन बार समोर अज्ञातांनी शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 ला घडली
शिवसेना तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या
शिवसेना तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या- Arun Joshi
Published On

तिवसा : अमरावती नागपूर Amravati Nagpur राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिर्वाद वाईन बार समोर अज्ञातांनी शिवसेनेचे Shivsena तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या Murder केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 ला घडली. या घटनेमुळे शहरांत तणावपूर्ण वातावरण पसरले असून कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Shivsena Tiwsa City Chief Murdered

मिळालेल्या माहितीनुसार अमोल पाटील हे मित्रा सोबत वाईन बार मध्ये आले होते. अमोल पाटील व त्याचा एक मित्र बार जवळ बसले असता या ठिकाणी काही 3 ते 4 अज्ञात आरोपींनी अमोल पाटील यांच्या डोक्यावर सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. त्यानंतर अमोल पाटील यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करिता पाठवला आहे.

घटनास्थळी रक्त मोठ्या प्रमाणावर सांडले होते. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा तिवसा येथे खळबळ उडाली आहे. पोलीस बार मधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासात असून पुढील तपास करीत आहेत. तर आरोपींच्या मागावर पोलीस रवाना झाले आहेत..

हे देखिल पहा

शिवसेना तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या
जलतरणपटू साजन प्रकाशने रचला इतिहास; 'A'गटात पात्र ठरलेला पहिला भारतीय

एकाच वर्षातील हत्येची दुसरी घटना

वर्षाभरा आधी याच प्रकारे कडक लॉकडाऊनमध्ये शहरातील अजय दलाल या युवकाची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यांनतर आज पुन्हा हत्येची पुनरावृत्ती झाल्याने शहरांतील कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By- Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com