जलतरणपटू साजन प्रकाशने रचला इतिहास; 'A'गटात पात्र ठरलेला पहिला भारतीय

भारतीय जलतरण क्षेत्रात उत्साहाची लाट पसरवणारी घटना घडली आहे. केरळचा साजन प्रकाश हा जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपक स्पर्धेसाठी २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेसाठी 'A'गटासाठी पात्र ठरला आहे
साजन प्रकाश
साजन प्रकाश- Saam Tv
Published On

नवी दिल्ली : भारतीय जलतरण Swimming क्षेत्रात उत्साहाची लाट पसरवणारी घटना घडली आहे. केरळचा Kerala साजन प्रकाश Sajan Prakash हा जपानमधील Japan टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपक स्पर्धेसाठी २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेसाठी 'A'गटासाठी पात्र ठरला आहे. ही निवड होणारा तो पहिला भारतीय जलतरणपटू ठरला आहे. Kerala Swimmer Qualified in A Set of Olympics

रोममध्ये झालेल्या सेट्टे कोली ट्राॅफी स्पर्धेत पुरुषांच्या गटात साजन प्रकाशने २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत १ मिनिट ५६.३८ सेकंदाची वेळ नोंदवली. त्यामुळे तो आॅलिंपिकच्या 'ए' गटासाठी पात्र ठरला.

हे देखिल पहा

२०१६ मध्ये झालेल्या रिओ आॅलिंपिक स्पर्धेसाठी 'ए'गटात पात्र ठरण्यासाठीची साजन प्रकाशची वेळ अवघ्या ०.१ सेकंदाने हुकली होती. त्यानंतर कसून सराव करत साजन प्रकाशने आॅलिंपिकच्या 'ए'गटान पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला. साजन प्रकाश टोकियो आॅलिंपिकमध्ये गुजरातच्या माना पटेल हिच्या बरोबर सहभागी होणार आहे.

साजन प्रकाश
दिनांक : 27 जून 2021 - राशिभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com