Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: स्पिरिट नंतर प्रभासच्या मेगा बजेट चित्रपटातून दीपिका पदुकोणची एक्झिट

Deepika Padukone Exit Kalki 2: बॉलीवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. दिपीकाने स्पिरीटनंतर कल्की २ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Deepika Padukone Exit Kalki 2: बॉलीवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. तिने आयुष्यातील नुकताच एक मोठा टप्पा गाठला आहे. तिने काही काळापूर्वीचं एका गोड मुलीला जन्म दिला आहे. मातृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दीपिकाने आपल्या कामाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्याची भूमिका घेतली. ती आता कोणताही प्रकल्प निवडताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत आहे. याचसह दिपीकाने स्पिरीटनंतर कल्की २ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक नाग अश्विन यांचा विज्ञानकथा पट ‘कल्कि 2898 एडी’ प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. या चित्रपटात दीपिकाची व्यक्तिरेखा अत्यंत महत्वाची होती. कथानकात तिचे पात्र भविष्यात भगवान विष्णूचा दहावा अवतार ‘कल्की’ जन्म देते असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दीपिका महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती.

मात्र, वैजयंती चित्रपट या निर्मिती संस्थेने नुकतीच एक अधिकृत घोषणा केली. त्यांनी जाहीर केले की, दीपिका पादुकोण ‘कल्कि 2898 एडी’ च्या सिक्वेलचा भाग असणार नाही. याआधी ती प्रभाससोबतच्या ‘स्पिरीट’ या चित्रपटातही दिसणार नसल्याची माहिती समोर आली होती. सलग दोन मोठ्या चित्रपटांतून दीपिकेच्या बाहेर पडण्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

निर्मात्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतला आहे. योग्य भागीदारी होऊ शकली नाही, त्यामुळे दीपिका पुढील चित्रपटात नसणार आहे.” या निवेदनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली, तर काहींनी दीपिकेच्या कौटुंबिक कारणांबद्दल सहानुभूती दर्शवली.

दीपिकाच्या जवळच्या सूत्रांनुसार, सध्या ती आपल्या मुलीवर विशेष लक्ष देत आहे . तिने चित्रपट निर्मात्यांकडे काही विशिष्ट अटी मांडल्या होत्या, ज्यात “दररोज फक्त ८ तासांची शूटिंग शिफ्ट” हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा होता. या अटीमुळे काम-जीवन संतुलन साधता येईल, असे तिचे म्हणणे होते. मात्र काही निर्माते या अटींवर तयार नसल्यामुळे तिला हे चित्रपट सोडावे लागतं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

The Bads Of Bollywood Premiere: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रिमियरला बॉलिवूडची हजेरी

SCROLL FOR NEXT