Urfi Javed Gets Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

उदयपूर घटनेचा उर्फी जावेदनं नोंदवला निषेध, परखड बोलली; येऊ लागले धमकीचे मेसेज, तुला...

राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेवरही तिनं भाष्य केलं. या घटनेचा तिने निषेध नोंदवला. यानंतर उर्फीला धमकीचे मेसेज येऊ लागले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : तोकडे कपडे आणि बोल्डनेसमुळं कायम चर्चेत असलेली फॅशनिस्टा उर्फी जावेद(Urfi Javed) पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारण वेगळं आहे. स्पष्टवक्तेपणामुळंही तिला अनेकदा 'ट्रोलधाडी'ला सामोरं जावं लागलं आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेवरही तिनं भाष्य केलं. या घटनेचा तिने निषेध नोंदवला. यानंतर उर्फीला धमकीचे मेसेज येऊ लागले आहेत.

उदयपूर येथील कन्हैयालाल हत्येच्या घटनेचा उर्फी जावेदनं तीव्र शब्दांत निषेध केला. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम(Instagram) अकाउंटवर यासंदर्भात स्टोरी पोस्ट केली. 'धर्माच्या नावाखाली असा रानटीपणा अल्लाहला कधीच मान्य नाही. आपण शिक्षण, महिला सशक्तीकरण, बलात्कारासारख्या धक्कादायक घटना, जीडीपीचा मुद्दा आदींवर का बोलत नाहीत?,' असा परखड सवाल तिनं पोस्टमधून केला आहे.

'खूप उशीर झालेला नसेल तर, डोळे उघडा. मला माहीत आहे की यानंतर माझा खूप तिरस्कार वाटेल, पण निदान माझ्यात तुमच्यासारखा द्वेष भरलेला नाही.', असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उर्फीच्या या पोस्टनंतर तिला धमकीचे मेसेज येत आहेत. काहींनी तर तिला आक्षेपार्ह मेसेजही केले आहेत. उर्फीने या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटाच्या स्टोरीवर शेअर केला आहे.

एका यूजरनं उर्फीला राक्षस म्हटलं आहे. तसंच तिला शिवीगाळही केली आहे. 'तोंड बंद कर, तुला इस्लाम काय आहे हे माहीत देखील आहे का? असा सवाल त्याने उर्फीला केला आहे. यानंतर संबंधित यूजरविरोधात तक्रार करणार असल्याचं उर्फीनं सांगितलं.

'मी या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार करणार आहे. ही व्यक्ती धर्माच्या नावाखाली जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. अशा व्यक्तींना धडा शिकवलाच पाहिजे. आता उर्फीने तक्रार नोंदवल्यानंतर मुंबई पोलीस संबंधित व्यक्तीविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT