After Operation London Cafe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: मराठी चित्रपटांना साऊथचा टच; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'मध्ये 'हे' कलाकार दिसणार ॲक्शन अवतारात

After Operation London Cafe: गेल्या काही काळापासून 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

After Operation London Cafe: गेल्या काही काळापासून 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके अभिनीत 'ऑपरेशन लंडन कॅफे' हा चित्रपट आहे. हा सिनेमा संपूर्ण भारतात मराठी, कन्नड, आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहून हा सिनेमा एक्शन पॅक्ड असल्याचं दिसतय. आणि हेच पोस्टर चित्रपटाची उंची, भव्यता दर्शवत आहे.

हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. एक्शन पॅक्ड अशा या चित्रपटाला रोमँटिक झालर आहे ती कशी ते मात्र तुम्हाला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा एक अनोखा पैलू म्हणजे कन्नड कलाकारांनी या चित्रपटासाठी मराठी भाषा शिकली आणि मराठी कलाकारांनी चित्रपटातील भूमिकांसाठी कन्नड भाषा शिकली.

चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरने अर्थात सिनेमाप्रती उत्सुकता वाढविली आहे. पोस्टरवरील कलाकार तर पॉवर पॅक्ड अभिनय देण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. कवीश शेट्टी आणि मेघा शेट्टी यांनी त्यांच्या अभिनयाने साऊथ सिनेसृष्टी गाजवली आहे तर शिवानी सुर्वेच्या अभिनयाचा आणि ग्लॅमरसचा केवळ महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्राबाहेरही मोठा चाहतावर्ग आहे. तर विराट मडकेच्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाची भर पडणार आहे. अश्विनी चवरे हिच्याही अभिनयाची जादू या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्मस’ बॅनर आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण आर.डी. नागार्जुन यांनी केले आहे. येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, काय निर्णय झाला? VIDEO

Friday Horoscope : दिवसभरात महत्त्वाची वार्ता कानावर पडणार; ५ राशींच्या लोकांचं आयुष्यात मोठं काहीतरी घडणार

Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

ममता कुलकर्णीचं दाऊद प्रेम उफाळलं, साध्वी ममतासाठी दाऊदही साधू

SCROLL FOR NEXT