After MS Dhoni The Untold Story Second Movie On Dhonis Life Saam Tv
मनोरंजन बातम्या

M. S. Dhoni 2nd Biopic: ठरलं... एम. एस. धोनीच्या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख ठरली; चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार?

After MS Dhoni The Untold Story Second Movie On Dhonis Life: धोनीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Mr And Mrs Mahi Release Date: क्रिकेट विश्वात आपल्या दमदार खेळीने क्रिकेटप्रेमींमध्ये एम. एस. धोनीने आपली स्पेशल ओळख निर्माण केली. भारतीय क्रिकेटसंघात सर्वोत्तम कर्णधारांमध्ये एमएस धोनीची नेहमीच गणना होते. धोनीच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. धोनी क्रिकेटच्या मैदानावर असताना त्याचा हा पहिला बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अशातच धोनीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एम. एस. धोनीच्या दुसऱ्या बायोपिकचे नाव‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ (Mr And Mrs Mahi) असे आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. आता नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ हा धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेला दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना फारच भावला. या चित्रपटामध्ये महेंद्र सिंग धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसून आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण १३३ कोटींची कमाई केली आहे.

धोनीच्या दुसऱ्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’मध्ये राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हे दोन सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘रुही’ नंतर राजकुमार आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ची घोषणा केली होती. २०२२ मध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं असून आता हा चित्रपट पुढील वर्षी १५ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थोडक्यात चित्रपटाचे सांगायचे तर, राजकुमार राव महेंद्र सिंग धोनीच्या भूमिकेत तर, जान्हवी कपूर माहीच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान , चित्रपटात या दोघांचीही क्यूट लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Home Cleaning Tips: लादी पुसताना पाण्यात टाका मीठ, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

SCROLL FOR NEXT