दिग्दर्शक किरण राव यांचा 'लापता लेडीज' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने काही दिवसांपूर्वीचं ऑस्कर २०२५च्या यादीमध्ये आपले नाव कोरले आहे. या चित्रपटानंतर आता आणखी एका चित्रपटाने या यादीमध्ये त्याचं स्थान निर्माण केले आहे. 'लापता लेडीज या चित्रपटानंतर 'संतोष' या चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारच्या शर्यतीत निवड करण्यात आली आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (IFFI)ने सध्या सुरी यांच्या 'संतोष' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म क्षेणीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. या चित्रपटामध्ये शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या दरम्यान संतोष या चित्रपचाची ऑस्कर २०२५साठी निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड टीश ॲकेडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स यांच्याकडून करण्यात आली आहे. हा चित्रपट सध्या तूफान लोकप्रिय होताना दिसतोय.
सध्या सुरी यांनी 'संतोष' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१४मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यूकेमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. यामुळे जगभरात या चित्रपटाला प्रसिद्ध मिळाली आहे. आतापर्यंत ऑस्कर पुरस्कारासाठी 'लापता लेडीज' आणि 'संतोष' या दोन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. संतेष हा चित्रपट हिंदीमध्ये चित्रित करण्यात आला आसून या चित्रपटामध्ये शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. यांच्यासोबत संजय बिश्नोई, कुशल दुबे या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये काम केले आहे.
'संतोष' हा एक इन्वेस्टिगेटिव्ह थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे कथानक उत्तर भारतातील एका गावावर लिहिले आहे. यामध्ये एका नवविवाहित वधूबद्दल कथा दाखवली आहे. परंतु लग्नाच्या काही दिवसांमध्येच तिच्या पतीचे निधन होते. त्यानंतर त्या महिलेला पतीची पोलिस हवलदाराची नोकरी मिळते आणि यानंतर त्या महिलेच्या आयुष्यामध्ये नवीन आव्हान येतात. या दरम्यान तिच्या आयुष्यामध्ये अनेक मोठ्या घटना घडतात.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.