Rakhi Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Emotional Video : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राखी सावंत थेट हॉस्पिटलमध्ये; रडताना व्हिडिओ केला शेअर

राखीने हॉस्पिटलमधला रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तिची आई सुद्धा दिसत आहे.

Pooja Dange

Rakhi Sawant Mother is hospitalised: अभिनेत्री राखी सावंत नुकतीच 'बिग बॉस मराठी'च्या घरामधून बाहेर आली आहे. घरातून बाहेर येताच तिला मोठा धक्का बसला आहे. राखी सावंतची आई जया भेडा यांना कॅन्सरनंतर आता ब्रेन ट्युमर झाला आहे. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. राखीने हॉस्पिटलमधला रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिची आई सुद्धा दिसत आहे.

व्हिडिओमध्ये राखी सावंत सांगत आहे की, रविवारी रात्री मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आले. मला समजले की माझ्या मम्मीची तब्येत ठीक नाहीये. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. मम्मीला कँसर आहे आणि आता ब्रेन ट्युमर देखील झाला आहे. तुम्ही कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या प्रार्थनांची गरज आहे.

त्यानंतर व्हिडिओमध्ये राजेश नावाचा एक व्यक्ती येतो. राखी त्यांना विचारते काय झालं? तेव्हा राजेश म्हणतात की, त्याच्या शरीराचा डावी बाजूला लकवा मारला होता. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. इथे आणल्यानंतर जेव्हा त्यांचा स्कॅन आणि एमआरआय केले तेव्हा समजले की त्यांना ब्रेन ट्युमर आहे. तात्यांना कॅन्सर तर आधीपासून होता.

राखी डॉक्टरांशी सुद्धा बोलली आहे. त्यांनी सांगितले की राखीच्या आईचा कॅन्सर फुफ्फुसांमध्ये पसरला आहे. त्याच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यांचा रिपोर्ट अजून यायचं आहे. त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ की त्यांना त्यांना रेडिएशन थेरपी कशी आणि किती द्यायची. रेडिएशन शिवाय राखीच्या आईवर कशाचा उपयोग होणार नाही. त्यांच्यासाठी अजून कोणताही पर्याय नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT