Lata Mangeshkar's Greatest Song: Ae Mere Watan Ke Logon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lata Mangeshkar: लतादीदींच्या 'या' गाण्याने तत्कालीन पंतप्रधान दिवंगत नेहरुजींनाही अश्रू अनावर झाले होते...

Lata Mangeshkar's Greatest Song: लतादीदींनी गायलेललं ते गाणं अजरामर झालंय. गेली ६ दशकं हे गाणं प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे.

साम टिव्ही

स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) अर्थात लतादीदी (Latadidi) जेव्हा गाणं गायच्या तेव्हा श्रोत्यांच्या कानांतून थेट हृदयात लतादीदींचा आवाज घुमत असे. गाण्यातला प्रत्येत शब्दामध्ये शब्दाच्या अर्थानुसार त्या अक्षरशः भावना ओतायच्या. त्यांंची अनेक गाणी जगप्रसिद्ध आणि सदाबहार (Evergreen) झाली. त्यांनी गायलेल्या एका गाण्याणं (Lata Mangeshkar's Greatest Song) तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. लतादीदींनी गायलेललं ते गाणं अजरामर झालंय. गेली ६ दशकं हे गाणं प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. ते गाणं आहे, कवी प्रदीप यांनी लिहिलेलं (Ae Mere Watan Ke Logon) 'ऐ मेरे वतन के लोगों'... (Ae Mere Watan Ke Logon Lata Mangeshkars greatest Song)

ऐका लतादीदींचं ते अरजामर गाणं

१९६२ च्या भारत-चीन युद्धात (Indo China War 1962) भारताचा दारुण पराभव झाला होता. भारताचे अनेक सैनिक शहीद झाले होते. देश हरला होता, देश दुःखात होता. तेव्हाच्या परिस्थितीत देशातील नागरिकांच्या जखमेवर फुंकर घालण्याचं काम कलाकारांनी केलं. देशातील जनतेचं मनोबल वाढवण्यासाठी, देशभक्ती जागवण्यासाठी सरकार प्रयत्नशील होतं. देशभक्तीपर गाणी, साहित्य, चित्रपट इत्यादींना सरकार प्रोत्साहन देत होते. अशात कवी प्रदीप (Kavi Pradeep) यांनी एक गाणं लिहिलं. माहिमच्या बीचवर फेरफटका मारत असताना कवी प्रदीप यांना तेव्हाच्या परिस्थितीवर आधारित काव्य सुचलं. त्यांच्याजवळ तेव्हा पेन आणि कागद नसल्यानं त्यांनी एकाकडून पेन मागितला आणि सिगारेट बॉक्समधील सिल्व्हर पेपरवर गाणं उतरवलं. त्यानंतर ते लतादीदींना वाचूव दाखवलं. लतादीदींनीही गायला होकार दिला, आणि खूप अडथळ्यांनंतर अखेर हे गाणं तयार झालं.

२६ जानेवारी १९५३ जेव्हा नेहरुंच्या डोळ्यात अश्रू आले होते:

युद्ध नुकतंच संपलं, देश सावरण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लतादीदींनी पहिल्यांदाच हे गाणं सार्वजनिकरीत्या गायलं, तेही नेहरुंच्या उपस्थितीत. कवी प्रदीप यांच्या हृद्यस्पर्शी शब्दरचना आणि लतादीदींना भावनिक आणि करुण स्वर यांच्या सुयोग्य संगमाने या गाण्यानं थेट उपस्थितांच्या हृद्यात प्रवेश केला. लतादीदींचं गाणं ऐकून पंडीत जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यातही पाणी आलं, त्यांना अश्रू अनावर झाले. दिल्लीतील रामलीला मैदानात झालेल्या या कार्यक्रमातील प्रत्येकजण हुंदके देऊन रडत होता, देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांप्रती सन्मान प्रकट करत होतो. हा करिष्मा होता लतादीदींच्या आवाजात... ज्याने पंतप्रधानांनाही रडवलं!

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT