Kriti Sanon Motion Poster Janaki From Poster Unveiled: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट सध्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रामनवमीच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत नवीन पोस्टर प्रदर्शित केले होते. पोस्टरमध्ये रामच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त दिसत आहे. सीतेच्या पोस्टर वरून झालेल्या बराच वादानंतर सीतानवमीच्या मुहूर्तावर आणखी एक नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. सीतानवमीच्या शुभमुहूर्तावर आदिपुरुषचा नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.
सीता नवमीच्या मुहूर्तावर, आदिपुरुषच्या निर्मात्यांनी क्रिती सेनॉनचे एक नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे, चित्रपटाची कथा हिंदू पौराणिक रामायणातील आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये, बॅकग्राऊंडला जय सिया राम सिया राम हे गाणं सीतेच्या पात्राची ओळख करून देताना वाजत आहे. सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनॉन दिसत आहे.
सध्या चाहत्यांकडून चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांनी ही पोस्टवर कमेंट केली आहे. क्रितीने आपल्या लूकमध्ये कसलीच कमी भासवलेली नाही, असं म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर आणखी एक चाहता म्हणतोय, क्रितीने सीतेच्या अभिनयासाठी कसलीच कमी पडून दिलेली नाही. असं म्हणत तिचे कौतुक केले. तर अवघ्या काही वेळेतच २ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळवले.
रामनवमीनिमित्त नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, तो पोस्टर पाहताच नेटकऱ्यांनी त्यामध्ये डझनभर चुका शोधल्या होत्या. अनेकांनी हनुमान, राम, सीता आणि लक्ष्मणाच्या लूकवर आक्षेप घेतला होता. सैफ अली खाननंतर आता कृती सनॉनच्या लूकवरही अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सीतेच्या भांगेत सिंदूर का दाखवला नाही, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला होता. परंतू आता क्रितीने शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये तिच्या भांगेत सिंधूर दाखवलंय.
‘आदिपुरूष’ हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, पण टीझर प्रदर्शनानंतर करण्यात आलेल्या टीकेमुळे निर्मात्यांसोबतच दिग्दर्शकांनाही चांगलेच ट्रोल केले. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर निर्मात्यांवर चौफेर टीका व्हायला लागली. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवल्याने चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्समध्ये आणखी बदल करण्याचा निर्णय घेतला. व्हिएफएक्समध्ये बदल केल्यानंतर १६ जून रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.