Adipurush Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush : 'आदिपुरुष'चे दिग्दर्शक चित्रपटात करणार मोठा बदल, रावणात होणार 'हे' बदल

चित्रपटातील व्हिएफएक्समध्ये बदल करण्यासाठी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून चित्रपट पुढच्या वर्षी जुनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Announcement Adipurush Movie: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाची काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटाबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता होती. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याने चांगला धुमाकुळ घातला होता.

चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चित्रपटातील बऱ्याच दृश्यांवर नेटकऱ्यांचा विरोध होता. मुख्यत: चित्रपटातील व्हिएफएक्स आणि काही तांत्रिक कारणांमुळे प्रेक्षक नाराज झाले होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला नेटकऱ्यांचा रोष आणि ट्रोलधाडीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटामध्ये आवश्यक बदल करण्यासाठी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला आहे.

जेव्हा चित्रपटाची घोषणा करण्यात आली त्यावेळी चित्रपटाची तारीख १२ जानेवारी २०२३ ही तारीख जाहीर करण्यात आली होती. पण चित्रपटातील व्हिएफएक्समध्ये बदल करण्यासाठी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट पुढील वर्षात जुनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रावणाचे पात्र अभिनेता सैफ अली खानने साकारले होते. त्याच्या भूमिकेला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

आहे. चित्रपटात रावणाच्या भूमिकेत काही त्रुटी असल्याने त्याला चांगलेच ट्रोल केले होते. सैफ अली चित्रपटात रावणासारखा दिसत नसल्याने त्याच्यावर सर्वत्र ट्रोलधाडी सुरु होती. सैफच्या दाढीवरही अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे नवीन लुकमध्ये त्याची दाढी नसणार याची चर्चा होत आहे.

नुकतेच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे, त्या पोस्टमध्ये त्याने चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेसोबत चित्रपटात काय नवीन बदल करण्यात येणार या संबंधित माहिती शेअर केली आहे. ओम राऊत त्या पोस्टमध्ये म्हणतो, 'आदिपुरुष' हा केवळ चित्रपट नसून, प्रभू श्रीराम यांच्या प्रती असलेली भक्ती आणि आपल्या गौरवशाली इतिहास, संस्कृतीच्या प्रती असलेल्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.'

सोबतच पुढे दिग्दर्शक म्हणतो, 'प्रेक्षकांना चित्रपट पाहताना अद्भुत अनुभव मिळावा यासाठी सिनेमाशी जोडलेल्या लोकांना अधिकचा थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे; त्यामुळे १६ जून २०२३ला हा सिनेमा प्रदर्शित होईल. भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

फक्त प्रेक्षकांचं प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद हवा आहे.' सिनेमाच्या व्हीएफएक्ससाठी आणि काही बदलांसाठी आणखी १०० कोटी रुपये खर्च होणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'आदिपुरुष' या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, आणि कृती सेनन ही तगडी कलाकारांची फौज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट मध्यंतरी वादात अडकला होता.

आता मात्र या टीकेची दखल घेऊन निर्माते यात सुधारणा करणार आहेत. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

SCROLL FOR NEXT