Manoj Muntashir On Hanuman Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush controversy: हनुमान देव नाही...;'आदिपुरूष'मधील डायलॉगवरून वाद पेटला असतानाच लेखकाचं मोठं वक्तव्य

Priya More

Writer Manoj muntashir: साऊथचा सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन स्टारर 'आदिपुरुष' (South Superstar Prabhas) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील (Adipurush Movie) संवाद आणि कथा यावरुन जोरदार वाद सुरु आहे. या चित्रपटाच्या विरोधामध्ये देशभरात निदर्शने आणि आंदोलने केली जात आहेत.

हा चित्रपट जास्त करुन संवादामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचे संवाद लिहिणारे लेखक मनोज मुंतशिर हे सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. अशामध्ये मनोज मुंतशीर यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

लेखक मनोज मुंतशिर यांनी भगवान हनुमानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मनोज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःचा बचाव केला आणि भगवान हनुमानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, 'चित्रपटात हनुमानाने श्रीरामासारखा संवाद साधला नाही. कारण तो देव नाही. तो एक भक्त आहे. आम्ही त्याला देव बनवले आहे. कारण त्याच्या भक्तीत ती शक्ती आहे.'

मनोज मुंतशिर यांनी भगवान हनुमानाबाबत हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आदिपुरुषांच्या संवादांवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मनोज मुंतशीर सतत मीडियाशी संवाद साधत मुलखत देत आहे. खरे तर त्यांनी लिहिलेले संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले नाहीत. अशा परिस्थितीत ते स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मनोज यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन नेटिझन्स संतप्त झाले असून ते त्यांच्यावर पुन्हा टीका करत आहेत.

सोशल मीडियावर त्यांना पुन्हा ट्रोल केले जात आहे. काहींना त्यांना मुलाखती न देण्याचा सल्ला दिला आहे. मनोज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने असे म्हटले आहे की, 'त्याचे मन हरवले आहे... भगवान हनुमान हे शिवाचे रूप आहेत.' दुसरा युजर म्हणतो की, 'सर्वप्रथम मनोज मुंतशीरने मुलाखत देणे बंद करावे.' तर तिसरा युजर म्हणतो की,'कृपया कोणीतरी याला शांत करा.'

दरम्यान, आदिपुरुष चित्रपटातील संवादानंतर लेखक मनोज यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सतत त्यांना सोशल मीडियावर देखील ट्रोल केले जात आहे. अशामध्ये मनोज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी निर्णय घेत मनोज यांना सुरक्षा पुरवली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT