Adipurush Collection  Instagram @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush Advance Booking : प्रदर्शनाआधीच 'आदिपुरुष'ने कमवले हजारो डॉलर्स; KGF Chapter 2 चित्रपटाला टाकले मागे

Pooja Dange

Pre-Leased Collection Of Adipurush : सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या वीकेंडला म्हणजेच १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुषा प्रदर्शित होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रिय झाला आहे. तर आदिपुरुषची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

भारतातील 'आदिपुरुष'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते भूषण कुमार यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली असून आदिपुरुषच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची माहिती दिली आहे. ही पोस्ट क्रिती सेनन आणि प्रभाससोबत शेअर करण्यात आली आहे. (Latest Entertainment News)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, या महाकाव्य चित्रपटाचा अनुभव घेणारी पहिली व्यक्ती व्हा. आदिपुरुषचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग रविवारपासून सुरू होत आहे. याचा अर्थ तुम्ही 11 जून 2023 रोजी आदिपुरुष तिकिटे बुक करू शकता आणि या बिग बजेट चित्रपटाचा अनुभव घेऊ शकता.

प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाचे परदेशात देखील अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या 7 दिवस आधीपासून अनेक देशांमध्ये बुकिंग सुरू झाले आहे. केवळ 8 ठिकाणी चित्रपटाचे उत्कृष्ट अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. या ८ ठिकाणांहून चित्रपटाने 16 हजार डॉलर्स कमावले आहेत. या कमाईने आदिपुरुष चित्रपटाने KGF चॅप्टर 2 ला मागे टाकला आहे. KGF फक्त 6 ठिकाणी रिलीज झाला, ज्याने बुकिंगमध्ये फक्त 2,900 हजार डॉलर्स कमावले होता.

आदिपुरुषाची क्रेझ भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे. प्रभास आणि क्रिती सेननचा हा चित्रपट परदेशी भूमीवर चांगली कमाई करू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या देशांत आदिपुरुष चांगले कलेक्शन करू शकतो, असा विश्वास आहे. या पौराणिक चित्रपटामध्ये प्रभास आणि क्रिती सेननचा अभिनय चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत आहे.

आदिपुरुष रिलीज होण्यापूर्वी संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिरुपतीमध्ये 'आदिपुरुष'चा फायनल ट्रेलर प्रदर्शित झाला. टीझर रिलीज झाल्यापासून आदिपुरुष प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. मात्र, चित्रपटातील राम-सीतेच्या लूकपासून ते व्हीएफएक्सपर्यंत अनेक गोष्टींमुळे आदिपुरुषही ट्रोलच्या निशाण्यावर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT