Bhaurao Karhade Share Tweet: भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित टीडीएम चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. भाऊराव कऱ्हाडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन देखील केले आहे.
भाऊराव कऱ्हाडे यांचे ट्विट
भाऊराव कऱ्हाडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाखातर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात #टीडीएम पुन्हा प्रदर्शित होत आहे, तुम्ही दिलेल्या पाठबळामुळेच हे शक्य झालं आहे तेव्हा भेटूया थेटरात, आपली तिकिटे बुक करा आणि अनुभवा तुमच्या प्रत्येकाच्या मनातला चित्रपट.' (Latest Entertainment News)
का बंद झाले होत चित्रपटाचे शो?
टीडीएम चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी मराठीतील महाराष्ट्र शाहीर आणि हिंदीतील द केरला स्टोरी हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंच्या ‘टीडीएम’ चित्रपटातून भाऊरावांनी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी दिली.
शिवाय चित्रपटाचा विषय वेगळ्या धाटणीचा असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. मात्र चित्रपटाला प्राईम टाईम नसल्यानं, बऱ्याच ठिकाणी शो नसल्यानं हा चित्रपट थिएटरमधूनच काढण्यात आला होता. म्हणून चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचं ठरवलं आहे.
चित्रपटही सर्व कलाकारांनी चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांची भेट घेतली. त्यानंतर एक इमोशनल व्हिडिओ खूप व्हायरल होत होता. त्यानंतर अनेकजण चित्रपटाला सपोर्ट करण्यासाठी पुढे आले. यात अजित पवार, किरण माने आणि पुण्यातील शेतकरी बांधवांचा समावेश होता.
टीडीएममधील अनेक कलाकार नवखे आहेत. परंतु कलाकारांच्या अभिनयातून त्यांचा नवखेपणा अजिबात जाणवत नाही. खेड्यापाड्यातील नायकाचा हजरजबाबीपणा, त्याची चालण्या बोलण्याची पद्धत या सर्वाशी तुम्ही कनेक्ट व्हाल.
ट्रेलरमधील डायलॉग देखील दमदार आहेत. ट्रेलरमध्ये दिग्दर्शक भाऊरावांची देखील एन्ट्री पाहायला मिळतेय. ट्रेलरमधील 'लाथ मारशील तिकडे पाणी काढशील' हा डायलॉग लक्षवेधी ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.